छत्रपती संभाजीनगर-पुणे मार्गास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा, २ हजार कोटींतून होणार नूतनीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 12:02 PM2024-09-06T12:02:19+5:302024-09-06T12:02:38+5:30

छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा; टोल वसुली संपताच मार्ग एमएसआयडीसीकडे हस्तांतरित होणार

Chhatrapati Sambhajinagar-Pune National Highway status, renovation to be done at 2 thousand crores | छत्रपती संभाजीनगर-पुणे मार्गास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा, २ हजार कोटींतून होणार नूतनीकरण

छत्रपती संभाजीनगर-पुणे मार्गास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा, २ हजार कोटींतून होणार नूतनीकरण

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर - अहिल्यादेवीनगर मार्गे पुणे या विद्यमान मार्गाचे २ हजार कोटी ५० लाख रुपयांतून नूतनीकरण करण्यात येणार आहे. या मार्गावर चारचाकी कार वगळता इतर वाहनांकडून सध्या टोलवसुली सुरू असून, ती संपताच मार्ग महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात येईल, तसेच मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय गुरुवारी शासनाने घेतला.

सध्याच्या पुणे-शिरुर-अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पुणे ते शिरुर हा ५३ कि.मी.चा मार्ग सहा पदरी करण्यात येणार असून, एमएसआयडीसीमार्फत हे काम होईल. यासाठी ७ हजार ५१५ कोटी खर्च अपेक्षित आहे. शिरुर-अहमदनगर बाह्यवळण रस्त्यामार्गे छत्रपती संभाजीनगर हा सध्याचा रस्ता सुधारण्यासाठी २ हजार ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

टोलवसुली संपल्यानंतर एमएसआयडीसीकडे हस्तांतरण
शिरुर ते अहमदनगर या मार्गामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पथकर वसुली होत आहे. त्यामुळे ही पथकर वसुली संपल्यानंतर हा मार्ग एमएसआयडीसीला हस्तांतरित करण्यात येईल. अहिल्यादेवीनगर (अहमदनगर) ते देवगड रस्ता सुधारण्यासाठी तो एमएसआयडीसीला हस्तांतरित करण्यात येईल. तसेच देवगड ते छत्रपती संभाजीनगर या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पथकर वसुली होत आहे. ती संपुष्टात आल्यानंतर हा मार्ग एमएसआयडीसीला हस्तांतरित करण्यात येईल.

सध्या रोडची अवस्था कशी
विद्यमान चौपदरी मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत.
विद्यमान रोडवर किती वाहने: छत्रपती संभाजीनगर ते पुणे या मार्गावर सध्या २० हजार वाहनांचा राबता आहे.
रोडचे रुंदीकरण केव्हा: या रोडचे रुंदीकरण २४ वर्षांपूर्वी झाले.
टोलवसुली कधीपर्यंत: अंदाजे पाच वर्षांपर्यंत टोलवसुली असेल.

Web Title: Chhatrapati Sambhajinagar-Pune National Highway status, renovation to be done at 2 thousand crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.