ऋतुराज, अंकित छत्रपती संभाजीनगरमध्ये खेळणार; BCCI च्या १८ लढतींचे यजमानपद मिळाले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 07:40 PM2024-09-19T19:40:00+5:302024-09-19T19:40:16+5:30
यंदाच्या हंगामात छत्रपती संभाजीनगर येथे एक रणजी करंडक, एक सी.के. नायडू करंडकासह १९ वर्षांखालील महिलांच्या ५ लढतींचे आयोजन
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरकरांसाठी यंदाच्या बीसीसीआयच्या हंगामात दर्जेदार लढती पाहण्याची मेजवानी मिळणार आहे. बीसीसीआयतर्फे २६ ते २९ ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्र आणि मेघालय या रणजी करंडक लढतीसह एकूण १८ सामन्यांचे यजमानपद छत्रपती संभाजीनगरला मिळाले असल्याची माहिती महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे सीएसी चेअरमन सचिन मुळे यांनी ‘लोकमत’ला दिली आहे.
यंदाच्या हंगामात छत्रपती संभाजीनगर येथे एक रणजी करंडक, एक सी.के. नायडू करंडकासह १९ वर्षांखालील महिलांच्या ५ लढतींचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सचिन मुळे म्हणाले.
छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या बीसीसीआयच्या लढती:
रणजी करंडक : २६ ते २९ ऑक्टोबर, महाराष्ट्र विरुद्ध मेघालय
सी.के. नायडू करंडक : १३ ते १६ ऑक्टोबर, महाराष्ट्र वि. त्रिपुरा
कुचबिहार करंडक : ६ ते ९ डिसेंबर, महाराष्ट्र वि. बिहार.
१९ वर्षांखालील मुलींच्या वनडे क्रिकेट स्पर्धा :
४ जानेवारी २०२५ : गुजरात वि. सिक्कीम, जम्मू- काश्मीर वि. सौराष्ट्र, पंजाब वि. बडोदा, ६ जानेवारी : गुजरात वि. पंजाब, जम्मू- काश्मीर वि. सिक्कीम, सौराष्ट्र वि. बडोदा. ८ जानेवारी : गुजरात वि. बडोदा, जम्मू- काश्मीर वि. पंजाब, सौराष्ट्र वि. सिक्कीम, १० जानेवारी : गुजरात वि. सौराष्ट्र, जम्मू- काश्मीर वि. बडोदा, पंजाब वि. सिक्कीम, १२ जानेवारी : गुजरात वि. जम्मू- काश्मीर, पंजाब वि. सौराष्ट्र, सिक्कीम वि. बडोदा.
दिग्गजांकडून शिकण्याची संधी
छत्रपती संभाजीनगरमध्ये याआधी भारत-न्यूझीलंड महिलांचा आंतरराष्ट्रीय सामना, दुलिप करंडक आणि अनेक रणजी करंडकांच्या लढती झाल्या आहेत. मात्र, या वेळेस प्रथमच बीसीसीआयच्या १८ सामन्यांचे यजमानपद छत्रपती संभाजीनगरला मिळाले आहे. बीसीसीआयच्या लढतीद्वारे भारतीय खेळाडू ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी आणि अंकित बावणे यांचा खेळ पाहण्याची संधी छत्रपती संभाजीनगरकरांना मिळणार आहे. यामुळे उदयोन्मुख खेळाडूंनाही दिग्गजांकडून शिकण्याची संधी मिळणार आहे.
-सचिन मुळे, सीएसी, चेअरमन, एमसीए