छत्रपती संभाजीनगरहून पुण्याला ई-बस शिवाई रवाना, प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By संतोष हिरेमठ | Published: May 18, 2023 12:19 PM2023-05-18T12:19:06+5:302023-05-18T12:19:11+5:30

राज्यभरात ५ हजार ई-बसेस आगामी कालावधीत धावणार आहेत.

Chhatrapati Sambhajinagar to Pune E-Bus Shivai departs, spontaneous response of passengers | छत्रपती संभाजीनगरहून पुण्याला ई-बस शिवाई रवाना, प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

छत्रपती संभाजीनगरहून पुण्याला ई-बस शिवाई रवाना, प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर :  एसटी महामंडळाची पहिली ई-बस शिवाई छत्रपती संभाजीनगरहून आज पुण्याला रवाना झाली. पहिल्याच दिवशी प्रवाशांनी भरून ही धावली.

पाहिले प्रवासी प्रा. एन. टी. ठाकरे, मनीषा ठाकरे यांच्या हस्ते या बसचे लोकार्पण झाले. यावेळी प्रादेशिक व्यवस्थापक नितीन मैंद, विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर, विभागीय वाहतूक अधिकारी अमोल अहिरे, आगार व्यवस्थापक अविनाश साखरे, लक्ष्मण लोखंडे, संतोष नजन, राजेंद्र मोटे, राजेंद्र वहाटूळे, शिवाजी बोर्डे, एल.डी. शहा, अभिजित सूर्यवंशी , बाबासाहेब साळुंके, स्वाती घोडे ,किशोर सोमवंशी आदी उपस्थित होते.

राज्यभरात ५ हजार ई-बसेस आगामी कालावधीत धावणार आहेत. या बसेस टप्प्याटप्प्यात दाखल होणार आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाला २०७ ई-बस मिळणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या बसेसची वाट पाहिली जात होती.

Web Title: Chhatrapati Sambhajinagar to Pune E-Bus Shivai departs, spontaneous response of passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.