विमान प्रवास करण्यात छत्रपती संभाजीनगरकर राज्यात चौथ्या स्थानी
By संतोष हिरेमठ | Published: November 29, 2024 02:22 PM2024-11-29T14:22:08+5:302024-11-29T14:24:33+5:30
मुंबईत सर्वाधिक विमान प्रवासी : पुणे दुसऱ्या, नागपूर तिसऱ्या स्थानी, २०१९ नंतर छत्रपती संभाजीनगरात सर्वाधिक विमान प्रवासी
छत्रपती संभाजीनगर : हवाई सफर करणाऱ्यांमध्ये वाढ होत असून, विमानाने प्रवास करण्यात छत्रपती संभाजीनगरकर राज्यात चौथ्या स्थानी आहेत. ऑक्टोबरमधील आकडेवारीवरून ही बाब दिसते. राज्यात सर्वाधिक विमान प्रवासी मुंबई विमानतळाचे आहेत. त्यापाठोपाठ पुणे दुसऱ्या आणि नागपूर तिसऱ्या स्थानी आहे. कार्गो वाहतुकीतही मुंबईच ‘नंबर वन’ आहे. राज्यातील १३ विमानतळांमध्ये शिर्डी विमानतळ पाचव्या स्थानी आहे.
चिकलठाणा विमानतळाची स्थिती
रोज लँडिंग - १०
रोज टेक ऑफ - १०
रोज येणारे प्रवासी - १,१८१
रोज जाणारे प्रवासी - १,०१०
इंडिगोची उड्डाणे - ९
एअर इंडिया - १
विमानसेवा - मुंबई, दिल्ली, हैदराबाद, गोवा, नागपूर, अहमदाबाद, बंगळुरू (१९ नोव्हेंबरची आकडेवारी)
राज्यातील विमानतळावरून ऑक्टोबरमध्ये किती विमानांचे उड्डाण, किती प्रवासी ?
विमानतळ - आंतरराष्ट्रीय उड्डाण - देशांतर्गंत उड्डाण - आंतरराष्ट्रीय प्रवासी - देशांतर्गंत प्रवासी - एकूण प्रवासी
मुंबई - ७,६३४----२०,२०४----१२,५३,८०५----३१,६९,७८४----४४,२३,५८९
पुणे - १०५----५,६९८----१४,२३८----८,४४,९९१----८,५९,२२९
नागपूर - ६५----१,९४१----६,६१३----२,३१,८५८----२,३८,४७१
छत्रपती संभाजीनगर - ०----६७५----०----६२,९२२-----६२,९९२
शिर्डी - ०-----६१६----०----५६,८२६----५६,८२६
नाशिक - ४२----४२२----४८----३३,८९९-----३३,९४७
कोल्हापूर - ०----२८७----०----१२,५७९----१२,५७९
जुहू - ०----२,१११---०----११,१५१----११,१५१
नांदेड - ०----२७३-----०----१०,८९३----१०,८९३
जळगाव - ०----२२२----०----८,५९१-----८,५९१
गोंदिया - ०----७०----०----१,९७०-----१,९७०
सिंधुदुर्ग - ०----७२----०----१,५९०----१,५९०
सोलापूर-०----०----०---- ०----०
विमानाने ऑक्टोबरमध्ये कुठून किती मालवाहतूक ? (मेट्रिक टन)
विमानतळ - आंतरराष्ट्रीय कार्गो - देशांतर्गत कार्गो
मुंबई - ५७,६८९.७ मे. टन - २१,०३९.१ मे. टन
पुणे - १९.६ मे. टन - ४१,४१.७ मे. टन
नागपूर - २.४ मे. टन - ८५३.६ मे. टन
छत्रपती संभाजीनगर - ०---१२४.२ मे. टन
शिर्डी - ०---५.७ मे. टन
नाशिक - ३६९.७ मे. टन--४०.६ मे. टन
पहिल्यांदाच एवढी जास्त प्रवासी वाहतूक
चिकलठाणा विमानतळावरून प्रवाशांची संख्या वाढत आहे. ऑक्टोबरमध्ये ६२,९२२ प्रवासी वाहतूक नोंदवली गेली. ६७५ विमान उड्डाणे व १२४.२ मेट्रिक टन कार्गो वाहतूक झाली. विमानतळाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी जास्त प्रवासी वाहतूक नोंदवली गेली. ६० हजार प्रवासी वाहतुकीचा टप्पा या आधी डिसेंबर २०१९ मध्ये होता. नोव्हेंबर २०२४ चे आकडेसुद्धा वाढीवच असतील. नाशिक येथे आंतरराष्ट्रीय विमानाने कार्गो वाहतूक अधिक आहे.
- अक्षय चाबूकस्वार, एअर कनेक्टिव्हिटी एव्हिएशन ग्रुप
विमानसेवा वाढीसाठी प्रयत्नशील
गोवा, नागपूरसाठी विमानसेवा सुरू झाली. त्यामुळे प्रवासी संख्येत वाढ झाली. विमानतळावरून नव्या विमानसेवा सुरू होण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आगामी काही दिवसांत नव्या विमानसेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे.
- शरद येवले, संचालक, चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ