लोकसहभागातून छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा

By Admin | Published: June 25, 2017 11:37 PM2017-06-25T23:37:10+5:302017-06-25T23:40:12+5:30

हिंगोली : येथील सार्वजनिक बांधकाम, विभाग विश्रामगृहाच्या बाजूला नियोजित जागेवर छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा लोकसहभागातून बसविण्याबाबत

Chhatrapati Shivaji's horse-drawn statue from the people's participation | लोकसहभागातून छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा

लोकसहभागातून छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील सार्वजनिक बांधकाम, विभाग विश्रामगृहाच्या बाजूला नियोजित जागेवर छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा लोकसहभागातून बसविण्याबाबत शहरातील रामलीला मैदान येथील महावीर भवनात २५ जून रोजी दुपारी १ वाजता बैठक घेण्यात आली.
कार्यक्रमाची सुरूवात प्रथम छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमात मान्यवरांनी पुतळा उभारणीच्या नियोजनासंदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी पुतळा समितीचे कार्याध्यक्ष आ. तान्हाजी मुटकुळे, आ. डॉ. संतोष टारफे, माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, पुतळा समिती अध्यक्ष, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, समिती सहसचिव, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, कृउबा सभापती रामेश्वर शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, नेत्रतज्ज्ञ डॉ. किशन लखमावार, बाबू कदम, माजी जि. प. उपाध्यक्ष उद्धवराव गायकवाड, नजीरभाई पुसेगावकर, माजी सभापती के. के. शिंदे, मधुकर मांजरमकर, जि. प. सदस्य प्रकाश थोरात, शिक्षण सभापती देशमुख, जि. प. सदस्य अ‍ॅड. अमोल जाधव, जि. प. सदस्य विठ्ठल चौतमल, द्वारकादास सारडा, बाजीराव इंगोले, जि. प. सदस्य मनीष आखरे, प्रकाश सोनी, मनोज आखरे, विलास जाधव, डॉ. भानुदास जाधव, प्रकाश इंगोले, बाबूराव पवार, वैभव खिल्लारे, डॉ. नामदेव कोरडे, शिवाजी मेटकर, प्रा. साकळे, कैलास काबरा, पंडित अवचार, विश्वनाथ गायकवाड, राज कऱ्हाळे, सचिव त्र्यंबकराव लोंढे, खंडेराव सरनाईक, समिती कोषाध्यक्ष डॉ. प्रल्हाद शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील जि. प., पं. स. सदस्य, सभापती, सरपंच, ग्रामसेवक, विविध संघटनेचे पदाधिकारी व सर्व समाजातील नागरिक उपस्थित होते. सदर बैठकीत सर्वांनी छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा हा लोकसहभागातून पूर्ण व्हावा याकरिता सहकार्य करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. त्याअनुषंगाने बैठकीत सात लाख पन्नास हजार रुपयांचे पावतीबुक (कूपन) उपस्थित नागरिकांनी घेऊन गेले. नजीरभाई पुसेगावकर, डॉ. किशन लखमावार, डॉ. प्रकाश शिंदे वापटीकर, कृउबाचे सभापती रामेश्वर शिंदे यांनी लोकसहभागात रक्कम देऊन सुरूवात केली. यशस्वीतेसाठी समितीचे प्रा. जावळे, बाबाराव श्रृंगारे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Chhatrapati Shivaji's horse-drawn statue from the people's participation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.