अपघातामुळे टँकरचे एक नोझल तुटले; १७.५ मेट्रिक टन गॅसचा १ किमी परिसराला होता धोका

By विकास राऊत | Published: February 2, 2024 05:05 PM2024-02-02T17:05:02+5:302024-02-02T17:05:14+5:30

Chhatrapatisambhajinagar Gas Leak: भूतो न भविष्यती असे संकट शहरातील सुमारे एक किमी परिसरातील नागरी वसाहतींवर ओढवले असते.

Chhatrapatisambhajinagar Gas Leak:The accident broke one of the tanker's nozzles; 17.5 metric tons of gas was at risk in 1 km area | अपघातामुळे टँकरचे एक नोझल तुटले; १७.५ मेट्रिक टन गॅसचा १ किमी परिसराला होता धोका

अपघातामुळे टँकरचे एक नोझल तुटले; १७.५ मेट्रिक टन गॅसचा १ किमी परिसराला होता धोका

छत्रपती संभाजीनगर: गॅस टँकर उड्डाणपुलाच्या दुभाजकाला धडकून झालेल्या झालेल्या अपघात गॅस टँकचे तीन नोझलपैकी एक पूर्णत:, तर दुसरे अर्धे तुटले. टँकर अपघातानंतर अर्धा फूट पुढे घासत गेले असते तर तिन्ही नोझल तुटून सुमारे १७.५ मेट्रिक टन एलपीजीचा स्फोट झाला असता. भूतो न भविष्यती असे संकट शहरातील सुमारे एक किमी परिसरातील नागरी वसाहतींवर ओढवले असते.

१२०० घरगुती गॅस सिलिंडर भरतात एका टँकरमध्ये
---- १७.५ मेट्रिक टन एलपीजीचा टँक होता. १ टनामध्ये सुमारे ४० व्यावसायिक, तर ७० घरगुती गॅस सिलिंडर रिफील होतात. १२०० गॅस सिलिंडर पूर्ण टँकमध्ये रिफील केले जातात. यावरून गॅस गळतीचे संकट किती मोठे होते हे लक्षात येते. जर टँकरचा स्फोट झाला असता तर १ फेब्रुवारीचा दिवस छत्रपती संभाजीनगरकरांच्या कायम लक्षात राहिला असता.

मनपा प्रशासक पहाटेच अलर्ट...
मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांना पहाटे ५ वाजून १८ मिनिटांनी घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी पाेहोचले. सायंकाळी ७ वाजेपर्यंत ते घटनास्थळीच होते. त्या परिसरात काही ज्वलनशील पदार्थ, वस्तूंपासून होणारा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने ५०० मीटर अंतरातील शाळा, कॉलेज, बँक, दुकाने बंद करण्याचे आवाहन करत जवळील हॉटेल्स त्वरित रिकाम्या करण्याच्या सूचना दिल्या. मनपा नागरी मित्र पथकाचे प्रमुख प्रमोद जाधव, वाॅर्ड कार्यालय ०३, ०५ व ०७ यांचे स्वच्छता निरीक्षक यांनी परिसरातील हॉटेल्स रिकामे केले. महावितरणने विद्युत पुरवठा खंडित केला.

मनपाचे जवळपास ७० पाण्याचे टँकर....
आपत्ती व्यवस्थापन कक्ष प्रमुख स्वप्नील सरदार, मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन, अग्निशमन दलाच्या जवानांनी मदतकार्य सुरू केले. मनपा पाणीपुरवठा विभागाने जवळपास ७० टँकर ६ अग्निशमन बंब घटनास्थळी होते.

पब्लिक एड्रेस सिस्टीमने दिली माहिती...
---स्मार्ट सिटी कंट्रोल रूममधून ४०० ठिकाणी बसविलेल्या पब्लिक एड्रेस सिस्टीम (स्पीकर)द्वारे नागरिकांना या घटनेची माहिती देण्यात आली. जल बेल ॲपवरदेखील माहिती दिली. अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, सौरभ जोशी, सहायक आयुक्त नईम अन्सारी, सविता सोनवणे, प्रसाद देशपांडे, अग्निशमन विभागाचे सुरे व संबंधित अधिकारी, कर्मचारी मदतकार्यात होते.

जळगाव, पुण्यातून पथक

----जळगाव येथून रेस्क्यू टीम दाखल झाली. तसेच एनडीआरएफचे पथक, एलपीजी गॅस कंपनीचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दुसऱ्या टँकरमध्ये अपघातग्रस्त टँकरमधील गॅस भरण्यास दुपारनंतर सुरुवात झाली.

 

Web Title: Chhatrapatisambhajinagar Gas Leak:The accident broke one of the tanker's nozzles; 17.5 metric tons of gas was at risk in 1 km area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.