छावा कार्यकर्त्यांची दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:29 AM2017-12-19T00:29:06+5:302017-12-19T00:29:12+5:30
५९ मोर्चे काढूनही मराठा समाजाच्या मागण्या न सोडविणाºया राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी नागपूर येथे गेलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना पोलिसांनी अटक केली. याबद्दल सरकारचा निषेध करण्यासाठी छावा संघटनेच्या पदाधिकाºयांनी सोमवारी बसवर दगडफेक केली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेताच आंदोलनकर्ते पळून गेले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ५९ मोर्चे काढूनही मराठा समाजाच्या मागण्या न सोडविणाºया राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी नागपूर येथे गेलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना पोलिसांनी अटक केली. याबद्दल सरकारचा निषेध करण्यासाठी छावा संघटनेच्या पदाधिकाºयांनी सोमवारी बसवर दगडफेक केली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेताच आंदोलनकर्ते पळून गेले.
मराठा समाजाला ओबीसीचे आरक्षण द्यावे, स्वामीनाथन आयोग लागू करावा, यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी समाजाने राज्यात तब्बल ५९ मोर्चे काढले. ९ आॅगस्ट रोजी मुंबईत महामोर्चा मराठा क्रांती मोर्चाने काढला. प्रत्येक मोर्चाच्या प्रसंगी शासनाला निवेदन दिले आणि शासनाने मागण्या लवकरच सोडविण्याचे आश्वासन दिले. शासनाने मराठा समाजाला केवळ गृहीत धरले. समाजाच्या अनेक मागण्या आजही प्रलंबित आहेत. याबाबत शासनाला जाब विचारण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक नागपूर येथे अधिवेशनस्थळी गेले होते. त्यावेळी शासनाच्या आदेशाने पोलिसांनी क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना अटक केली. शासनाची ही दादागिरी असल्याचे नमूद करून छावा संघटनेच्या पदाधिकाºयांनी सोमवारी अक्कलकोट ते चाळीसगाव या एस. टी. बसवर दगडफेक के ली. ही बस सिडको बसस्थानक येथून मध्यवर्ती बसस्थानकाकडे जात होती. उच्च न्यायालयासमोरील पुलाजवळ बस असताना आंदोलनकर्त्यांनी बस अडविली. यावेळी एस. टी. बसचालक विजय त्रिंबक अहिरराव यांनी बस थांबविताच आमचे हे आंदोलन असून, तुम्ही बसच्या खाली उतरा, असे सांगितले. आंदोलनकर्त्यांनी दगडफेक केली. विशेष शाखेचे उपनिरीक्षक गोरख चव्हाण हे जळगाव रोडवर असताना या आंदोलनाची त्यांना माहिती मिळाली. ते लगेच एमजीएममार्गे जालना रोडवर आले. यावेळी पोलीस आल्याचे दिसताच आंदोलनकर्ते कारमध्ये बसून घटनास्थळावरून पसार झाले. एका पोलीस अधिकाºयाने प्रसंगावधान राखून धाव घेतल्याने अन्य वाहनांचे होणारे नुकसान टळले.