मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज जलवाहिनीचे भूमिपूजन
By Admin | Published: May 13, 2017 12:30 AM2017-05-13T00:30:35+5:302017-05-13T00:34:11+5:30
जालना : १२८ कोटी रूपये खर्चांच्या अंतर्गत जलवाहिनी कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी मामा चौकात सायंकाळी पाच वाजता होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील नागरिकांना योग्य दाबाने आणि सुरळीत पाणी मिळावे म्हणून १२८ कोटी रूपये खर्चांच्या अंतर्गत जलवाहिनी कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी मामा चौकात सायंकाळी पाच वाजता होत आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नातून आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर व माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्या पाठपुराव्यामुळे ही अंतर्गत जलवाहिनी मंजूर झाली आहे.
यासोबतच मुख्यमंत्री फडणवीस दुपारी जाफराबाद तालुक्यातील खासगाव सिंधी येथील जलयुक्त शिवार योजनेतील कामांची पाहणी करणार आहेत. सायंकाळी पाच वाजता अंतर्गत जलवाहिनी कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे हे राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आ. राजेश टोपे, आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे, माजी आ. कैलास गोरंट्याल, माजी आ. अरविंद चव्हाण, विलास खरात, जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, उपाध्यक्ष भास्कर दानवे आदी उपस्थित राहणार
आहेत.