लातूरकरांचे कृत्रिम पावसासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे
By Admin | Published: July 21, 2016 01:01 AM2016-07-21T01:01:51+5:302016-07-21T01:01:51+5:30
लातूर : लातूर जिल्ह्यात आतापर्यंत २२८ मि.मी. पाऊस झाला आहे. या पावसामुळे जमिनीत ओलही झाली नाही. जिल्ह्यातील साठवण तलाव, पाझर तलाव अद्यापही कोरडेठाक आहेत.
गणेश मापारी / खामगाव (जि. बुलडाणा)
गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी मूग आणि उडिदाचा पेरा वाढलेला आहे, तर कपाशीच्या पेर्यात मात्र घट आल्याचे दिसून येत आहे. मूग आणि उडीद या दोन्ही पिकांच्या क्षेत्रात जवळपास १0 हजार हेक्टरने वाढ झाली आहे, तर कापसाची लागवड १0 हजार हेक्टर क्षेत्राने कमी झाल्याचे दिसून येत आहे.
गेल्या वर्षी १७ हजार ९६१ हेक्टर क्षेत्रावर मुगाचा, तर १६ हजार ८६४ हेक्टर क्षेत्रावर उडिदाचा पेरा करण्यात आला होता. यावर्षी झालेल्या ९१ टक्क्यांच्या पेरणीमध्ये दोन्ही पिकांचा पेरा जवळपास १0 हजार हेक्टर क्षेत्राने वाढल्याचे दिसून येते. २५ हजार ४९६ हेक्टरवर मुगाची पेरणी करण्यात आली असून, २४ हजार ५ हेक्टर क्षेत्रावर उडिदाची पेरणी यावर्षी करण्यात आली आहे, तर १ लाख ६१ हजार हेक्टर क्षेत्रावर गतवर्षी कपाशीचा पेरा झाला होता. यावर्षी १ लाख ५३ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे कपाशीच्या पेर्यात १0 हजार हेक्टर क्षेत्राची घट झालेली आहे.
दोन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करीत असलेल्या शेतकर्यांना यावर्षी हवामान खात्याने चांगली बातमी दिली. खरिपाच्या पिकाला पोषक व दमदार पाऊस होणार असल्याचा अंदाज जाणकारांनीही व्यक्त केला. त्यामुळे शेतकर्यांनी मृग नक्षत्राच्या पूर्वीच मशागतीची कामे आटोपली. परंतु मृग नक्षत्राचे स्वागत करायला रिमझिम स्वरुपात बरसलेल्या पावसाने दोन आठवड्याची विश्रांती घेतली. जूनच्या दुसर्या आठवड्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे जून अखेरपासून दोन आठवडे खरिपाच्या पेरण्यांनी वेग घेतला.
जूनच्या सुरुवातीला २0-२२ टक्के झालेली पेरणी जुलैच्या पहिल्या आठवड्यावर ७0 टक्क्यांवर पोहोचली. दरम्यान, जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात सोयाबीनचा पेरा मोठय़ा प्रमाणात केला जात आहे. मागच्या वर्षीही ४ लाख ११ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती, तर १ लाख ६१ हजार ६२0 हेक्टर क्षेत्रावर कपाशी पेरण्यात आली होती. यावर्षी जिल्ह्यात झालेल्या पेरणीच्या ९१ टक्के क्षेत्रामध्ये सोयाबीनची पेरणी सर्वाधिक ४ लाख हेक्टरच्या जवळ पोहोचली आहे.