मुख्यमंत्र्यांना विरोध कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:04 AM2018-07-23T00:04:51+5:302018-07-23T00:05:38+5:30
पंढरपुरात दाखल झालेले वारकरी हे आमचेच माय-बाप आहेत. त्यांच्या सुरक्षेला मराठा क्रांती मोर्चाकडून कोणताही धोका नाही. वारकºयांना त्रास होईल, असे आंदोलन पंढरपूर किंवा वारकरी थांबलेल्या परिसरात होणार नाही, अशी माहिती औरंगाबाद मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पंढरपुरात दाखल झालेले वारकरी हे आमचेच माय-बाप आहेत. त्यांच्या सुरक्षेला मराठा क्रांती मोर्चाकडून कोणताही धोका नाही. वारकºयांना त्रास होईल, असे आंदोलन पंढरपूर किंवा वारकरी थांबलेल्या परिसरात होणार नाही, अशी माहिती औरंगाबादमराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांनी दिली.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनामुळे मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाच्या शासकीय पूजेसाठी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. वारकºयांच्या सुरक्षेला धोका असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला. यावर औरंगाबाद मराठा क्रांती मोर्चातर्फे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. पंढरपुरात वारकरी जेथे थांबले असतील, तेथे कोणतेही आंदोलन केले जाणार नाही. वारीच्या आडून काही धर्मांध शक्ती मराठा क्रांती मोर्चाच्या नावाने गोंधळ घालण्याची शक्यता आहे. त्याचे खापर मराठा समाजावर फोडण्याचे कारस्थान रचले जात आहे. पंढरपुरात येणाºया वारकºयांमध्ये आमचेच माय-बाप आहेत. त्यांना कोणताही त्रास होणार नाही, असे कृत्य मराठा क्रांती मोर्चातर्फे केले जाणार नाही. तसा निर्णय घेतला असल्याचेही मराठा क्रांती मोर्चाने स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा निर्णय घेऊनच पंढरपुरात विठ्ठलाच्या शासकीय महापूजेला जायला हवे होते. त्यांनी घेतलेली भूमिका ही निर्ढावलेपणाची आहे. आता मराठा समाज आरक्षणासाठी यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन करील. राज्याच्या परिवहनमंत्र्यांनी एस.टी. बसच्या झालेल्या तोडफोडीची नुकसानभरपाई आंदोलनकर्त्यांकडून वसूल करणार असल्याचे सांगितले. इतरवेळी मंत्री गप्प बसतात; मात्र मराठा समाजाच्या वेळीच यांना नियम, कायदे दिसतात, असे स्पष्ट करीत परिवहनमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेधही करण्यात आला.
दुसºया दिवशी ठिय्या आंदोलन कायम
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविण्यासाठी क्रांती चौकात शनिवारपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. दुसºया दिवशीही मराठा समाजातील नागरिक, युवक, विद्यार्थी, विविध संघटनांच्या पदाधिकाºयांनी घटनास्थळी येत आंदोलनात सहभाग नोंदवला.