मुख्यमंत्री ‘इन’, सिस्टिम ‘आऊट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 01:00 AM2017-08-05T01:00:01+5:302017-08-05T01:00:01+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शुक्रवारी विमानतळावर आगमन झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणेची धावपळ उडाली.

 Chief Minister 'In', system 'out' | मुख्यमंत्री ‘इन’, सिस्टिम ‘आऊट’

मुख्यमंत्री ‘इन’, सिस्टिम ‘आऊट’

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शुक्रवारी विमानतळावर आगमन झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणेची धावपळ उडाली. ‘डिपार्चर’ गेटने ते बाहेर पडल्यामुळे ‘अरायव्हल’ गेटजवळ तैनात असलेल्या सुरक्षा ताफ्याची आणि पोलीस अधिकाºयांची, तसेच कन्व्हायमधील वाहनांची भंबेरी उडाली. मुख्यमंत्री ‘इन’ गेटने बाहेर पडल्यामुळे विमानतळावरील सुरक्षा आणि प्रॉटोकॉलनुसार उपस्थित असलेल्या अधिकारी, पोलिसांची सुरक्षा सिस्टिम ‘आऊट’ झाली.
मुख्यमंत्र्यांना ‘झेड’ दर्जाची सुरक्षा असल्यामुळे ताफ्यातील चारचाकी वाहने इकडून तिकडे न्यावी लागली. कर्मचारी, अधिकारी, सुरक्षा यंत्रणा यांची काही मिनिटे ही धावपळ सुरू होती. गंगापूर तालुक्यातील गवळीशिवरा येथील अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त मुख्यमंत्री विशेष विमानाने चिकलठाणा विमानतळावर आले.
सकाळी १० वाजता विमानाने आल्यावर ‘आऊटगेट’ने बाहेर जाण्याऐवजी मुख्यमंत्री थेट विमानतळाच्या गेस्ट रूमकडे गेले. त्यांच्यासोबत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जलसंधारणमंत्री राम शिंदे होते. मुख्यमंत्री व मंत्री ‘आऊट’ऐवजी ‘इन’ गेटने विमानतळाबाहेर आले. इकडे आऊट गेटजवळ तैनात असलेले पोलीस, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकाºयांना मुख्यमंत्री ‘इनगेट’ने बाहेर येणार असल्याची माहिती मिळताच यंत्रणेची भंबेरी उडाली.

Web Title:  Chief Minister 'In', system 'out'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.