मुख्यमंत्री करणार गटशेतीची पाहणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 12:23 AM2017-09-30T00:23:14+5:302017-09-30T00:23:14+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे १६ आॅक्टोबर रोजी जालना जिल्ह्याच्या दौºयावर येत असून, या दौºयात जाफराबाद तालुक्यातील अकोला देव आणि देळेगव्हरण या गावांतील गटशेतीची पाहणी करणार आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे १६ आॅक्टोबर रोजी जालना जिल्ह्याच्या दौºयावर येत असून, या दौºयात जाफराबाद तालुक्यातील अकोला देव आणि देळेगव्हरण या गावांतील गटशेतीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर जिल्ह्याच्या विकासासंदर्भात सीडहब, आयसीटी व इतर मद्यांवर बैठक घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
खा. दानवे म्हणाले की, गत दोन वर्षांत सीडहब, आयसीटी, टेक्सटाईल पार्क, रेशिक क्लस्टर आदी प्रकल्प जिल्ह्यासाठी राज्य सकरारने मंजूर केले आहेत. मंजूर झालेले प्रकल्प पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आपला पाठपुरावा सुरु असून, याचा आढावा १६ आॅक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेणार आहेत.