चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विमानतळाच्या ‘टेकआॅफ ’ला खीळ :कनेक्टिव्हिटी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:36 AM2017-11-30T00:36:41+5:302017-11-30T00:36:45+5:30

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आकाशात मराठवाड्यातील नांदेडपाठोपाठ आता शिर्डी विमानतळाचे वादळ घोंगावत आहे. या दोन विमानतळांसह अन्य विमानतळांवरील हवाई कनेक्टिव्हिटी वाढीचा वेग पाहता भविष्यात चिकलठाणा विमानतळावरील विमानसेवा ‘जमिनीवर’ येऊन शहराची हवाई कनेक्टिव्हिटी धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विमानसेवा वाढविण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न करण्याची गरज आहे.

 Chikthathana International Airport's 'Take Faaf' bolt: Connectivity Trouble | चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विमानतळाच्या ‘टेकआॅफ ’ला खीळ :कनेक्टिव्हिटी संकटात

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विमानतळाच्या ‘टेकआॅफ ’ला खीळ :कनेक्टिव्हिटी संकटात

googlenewsNext

संतोष हिरेमठ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आकाशात मराठवाड्यातील नांदेडपाठोपाठ आता शिर्डी विमानतळाचे वादळ घोंगावत आहे. या दोन विमानतळांसह अन्य विमानतळांवरील हवाई कनेक्टिव्हिटी वाढीचा वेग पाहता भविष्यात चिकलठाणा विमानतळावरील विमानसेवा ‘जमिनीवर’ येऊन शहराची हवाई कनेक्टिव्हिटी धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विमानसेवा वाढविण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न करण्याची गरज आहे.
उडान या योजनेंतर्गत ट्रूजेट कंपनीने २७ एप्रिलपासून नांदेड येथून नांदेड -हैदराबाद विमानसेवा सुरू केली. तसेच नांदेड-मुंबई विमानसेवाही सुरू आहे. याचा थेट फटका थेट शहरातील विमानसेवेवर होत आहे. विमानसेवेसाठी पूर्वी नांदेड येथील नागरिकांना औरंगाबादचा पर्याय होता; परंतु आता औरंगाबादऐवजी नांदेडवरूनच विमान उपलब्ध झाले आहे. दुसरीकडे गत महिन्यात शिर्डी विमानतळावरून विमानसेवेचा शुभारंभ झाला. शिर्डी विमानतळाच्या लोकार्पणप्रसंगी मुख्यमंत्र्यांकडून मराठवाड्याऐवजी पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला अधिक प्राधान्य दिले जात असल्याचे दिसले. दहा विमान कंपन्या शिर्डीतून सेवा देण्यास इच्छुक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. शिर्डीहून हैदराबादसाठी विमानसेवा सुरू आहे.
नोकरी, उद्योग, राजकीय तसेच पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात दिल्लीहून प्रवासी विमानाने ये-जा करतात. यासाठी एअर इंडियासोबत स्पाईस जेटचे विमान महत्त्वाचे ठरत होते; परंतु फेब्रुवारी २०१५ मध्ये स्पाईस जेटचे विमान बंद झाले. याचा मोठा फटका विमानतळाला बसला आहे. विमानतळावर येणाºया आणि जाणाºया प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे. सुमारे ७० हजारांवर प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागला. यातील काही प्रवासी पुण्याकडे वळले तर उर्वरित मुंबई मार्गे दिल्लीला जाण्यावर भर देतात. शिर्डी, नांदेड विमानतळांमुळे आगामी कालावधीत आणखी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
विस्तारीकरणासाठी २०० कोटी
चिकलठाणा विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी २०० कोटी देण्याच्या घोषणेला अनेक महिने उलटून गेले. आता कुठे भूसंपादन संस्था म्हणून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्या. स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. विस्तारीकरणाबरोबर विमानसेवा वाढविण्यासाठी हालचाल करण्याची गरज आहे.
अन्यथा विस्तारीकरण होऊनही विमानसेवा ‘जैसे थे’ राहण्याचे नाकारता येत नाही.
ही विमानसेवा हवी
औरंगाबादहून दिल्लीसाठी नवीन विमानसेवा सुरू करण्याची गरज आहे. देश-विदेशातील पर्यटकांची संख्या वाढण्यासाठी जयपूर- उदयपूर- दिल्ली विमान,तसेच बंगळुरू, चैन्नई, अहमदाबादसह बुद्धिस्ट सर्किटशी औरंगाबाद शहर विमानसेवेने जोडले जाण्याची गरज आहे. हैदराबादला जाण्यासाठी आणखी एखादी नवीन विमानसेवा सुरू झाली तरी त्यास मोठा प्रतिसाद मिळू शकतो,असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.
हैदराबादसाठी शिर्डी,
नांदेडकडे
ट्रूजेट कंपनी आता डिसेंबरमध्ये औरंगाबादेत आठवड्यातील तीनच दिवस सेवा देणार आहे. त्यामुळे इतर दिवशी औरंगाबादहून विमानाने हैदराबाद जाऊ इच्छिणारे प्रवासी नांदेड आणि शिर्डीकडे वळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
...तर दिल्ली विमानसेवा संकटात
आजघडीला दिल्लीहून येणारे बहुतांश प्रवासी हे शिर्डी आणि शनी शिंगणापूरला भेट देणारे असतात. या प्रवाशांना समोर ठेवून आगामी कालावधीत विमान कंपन्या थेट दिल्ली-शिर्डी अशी सेवा सुरू करू शकतात, असे झाले तर सध्या सुरू असलेल्या एअर इंडियाच्या औरंगाबाद-दिल्ली विमानसेवेला फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
प्रतिसाद; पण परिणाम नाही
एअर कार्गोसाठी विमानतळाचे विस्तारीकरण झाले पाहिजे. त्यामुळे मोठी विमाने येतील. छोट्या-छोट्या शहरांशी औरंगाबादची हवाई कनेक्टिव्हिटी झाली पाहिजे. हैदराबाद, चैन्नईसह औद्योगिक, पर्यटन शहरे, बुद्धिस्ट सर्किटला प्राधान्य दिले पाहिजे. ‘सीएमआयए’कडून मुख्यमंत्री, उद्योगमंत्री, पर्यटनमंत्र्यांकडे यासाठी पाठपुरावा केला जात आहे. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळतो; परंतु काही परिणाम होताना दिसत नाही.
-प्रसाद कोकीळ, अध्यक्ष, चेंबर आॅफ मराठवाडा
इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर (सीएमआयए)
परिणाम होण्याची शक्यता
बहुतांश वेळी दिल्लीचे विमान फूल असते. नवीन विमानसेवा सुरू करण्याचे सध्यातरी नियोजन नाही. अन्य कंपन्यांकडून दिल्ली-शिर्डी विमानसेवा सुरू झाली, तर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी स्पर्धेमुळे तिकीट दरात बदल करावा लागेल.
-रमेश नंदे, स्टेशन मॅनेजर,
एअर इंडिया

Web Title:  Chikthathana International Airport's 'Take Faaf' bolt: Connectivity Trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.