जैतापूरात चिकुनगुनिया, डेंग्यू साथीचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:06 AM2021-06-16T04:06:44+5:302021-06-16T04:06:44+5:30
शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व खासगी दवाखान्यात साथीच्या आजाराने ग्रस्त झालेल्या रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. जैतापूर ...
शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व खासगी दवाखान्यात साथीच्या आजाराने ग्रस्त झालेल्या रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. जैतापूर गावात डेंग्यूचे दोन रुग्ण आढळून आल्याने जिल्हा स्तरावरून पाहणीसाठी आरोग्य पथक दाखल झाले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत गावंडे यांनी जैतापूर गावात आरोग्य पथकाकडून तपासणी केली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच जलजन्य आजाराची साथ पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. आरोग्य पथकाने गावात तळ ठोकून ड्राय डे पाळण्याचे आवाहन केले जात आहे. कन्नड तालुक्यातील बऱ्याच गावात आरओचे जारयुक्त पिण्याचे पाणी मागितले जात आहे. ग्रामस्तरावर शुद्ध पाणी पुरवठ्याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. ब्लिचिंग पावडर, टाक्यांची व विहिरींची स्वच्छता याकडे ग्रामस्तरावर जलदूत काम करीत आहेत.