चिकुनगुनिया, डेंग्यूच्या रुग्णसंख्येत होतेय वाढ
By Admin | Published: September 25, 2016 11:48 PM2016-09-25T23:48:17+5:302016-09-26T00:10:45+5:30
लातूर : पावसाळा सुरू झाल्यापासून लातूर जिल्ह्यात जलजन्य आजारांचे प्रमाण वाढले असून, सर्वोपचार रूग्णालयात गर्दी वाढली आहे़
लातूर : पावसाळा सुरू झाल्यापासून लातूर जिल्ह्यात जलजन्य आजारांचे प्रमाण वाढले असून, सर्वोपचार रूग्णालयात गर्दी वाढली आहे़ हिवताप विभागाकडे ३३ डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. अॅबेटिंग, धूर फवारणी जनजागृती करूनही डासांचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे़
ताप, सर्दी, खोकला अशा संसर्गजन्य आजारांच्या रूग्णांची वाढ होऊ लागली आहे़ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालयात सप्टेंबर महिन्यात गॅस्ट्रो, डेंग्यू , चिकुनगुनिया, मलेरिया, तापीचे, टाईफाईडच्या रूग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.
ग्रामीण भागातही अशीच अवस्था आहे़ अतिसार पंधरवड्यात आरोग्य विभागाने जनजागृती केली. पण डासोत्पती दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनही हतबल झाले आहे़ जिल्ह्यातील खाजगी तसेच शासकीय रुग्णालयात या रुग्णांची संख्या वाढत असल्याची चिंता आरोग्य विभागालाही लागली आहे. (प्रतिनिधी)