खाजगी वसतिगृहांमध्ये मुलांचा छळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 12:08 AM2017-08-31T00:08:05+5:302017-08-31T00:08:05+5:30

जिल्ह्यात सध्या सर्वत्र खासगी वसतिगृहांचे जाळे पसरले आहे. या वसतिगृहांमध्ये मुलांचा अमानुष छळ होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

 Child abuse in private hostels! | खाजगी वसतिगृहांमध्ये मुलांचा छळ !

खाजगी वसतिगृहांमध्ये मुलांचा छळ !

googlenewsNext

सोमनाथ खताळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात सध्या सर्वत्र खासगी वसतिगृहांचे जाळे पसरले आहे. या वसतिगृहांमध्ये मुलांचा अमानुष छळ होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यावर मात्र कोणाचेही नियंत्रण नसल्याने हजारो रूपये घेऊन दुकानदारी करणाºया वसतिगृह चालकांची ‘डेअरिंग’ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जिल्ह्यात तब्बल ३०० हून अधिक खासगी वसतिगृह असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत मुले व मुलींची अशी १३ शासकीय वसतिगृह आहेत. तर खासगी वसतिगृहांची संख्या शेकडोमध्ये असल्याचे समोर आले आहे. वसतिगृह उभारण्यासाठी असणाºया अटींची पूर्तता करण्यास खासगी वसतिृह उदासिन असल्याचे दिसते. मुलांना पाणी, स्वच्छता गृह, अभ्यासासाठी टेबल, झोपण्यासाठी गादी, स्वच्छ रूम, जेवण, शांत परिसर यासारखा काहीच सुविधा नसतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर मोठा परिणाम होतो. त्यांना कोंडवाडा असणाºया या वसतिगृहात राहण्याची मानसिकता राहत नाही. त्यामुळे ते अनेकदा वसतिगृहातून पळून जातात. परंतु हे टाळण्यासाठी मुलांना दर्जेदार सुविधा आणि त्यांना मानसिक आधार देत शिस्त लावण्याची गरज आहे.
वडवणीत वसतिगृह चालकाकडून मुलाला बेल्टने मारहाण; प्रकरण दडपले ?
मुलांना शिस्त लावण्यासाठी थोडाफार मार देणे सहाजिक आहे. परंतु त्यांच्या अंगावरील सालटे जाईपर्यंत पट्टयाने मारहाण करणे कितपत योग्य आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. हा प्रकार वडवणी शहरातील एका खासगी होस्टेलमध्ये मंगळवारी उघडकीस आला आहे.
४हे प्रकरणे हातापाया पडून मिटविण्यात यश आले असले तरी मारहाण झालेल्या विद्यार्थ्याची मानसिकता खूप खचली आहे. या वसतिगृह चालकाने आपला गुन्हा कबूल केला असला तरी हा प्रकार माफिनाम्यासारखा आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
४मुलाच्या पालकांचा हा वसतिगृह चालक नातेवाईक असल्याचेही समोर आले आहे. पोलिसांपर्यंत हे प्रकरण गेलेच नाही, असे सूत्रांनी सांगितले. वडवणी ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप सागर म्हणाले, याबाबत कसलीही तक्रार आलेली नाही. तक्रार येताच गुन्हा दाखल करून घेऊ.

Web Title:  Child abuse in private hostels!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.