‘बालकामगार मुलांनी उच्च पदावर जावे’

By Admin | Published: June 12, 2014 11:50 PM2014-06-12T23:50:26+5:302014-06-13T00:36:10+5:30

जालना: बालकामगार मुलांनी बालमजुरी सोडून शिक्षण घेवून मोठ्या पदावर जावे, असे प्रतिपादन बाल न्यायमंडळाच अध्यक्षा तथा कनिष्ठ स्तरचे सह दिवाणी न्यायाधीश जे.एस.भाटीया यांनी आयोजित कार्यक्रमात केले.

'Child labor should go to a higher position' | ‘बालकामगार मुलांनी उच्च पदावर जावे’

‘बालकामगार मुलांनी उच्च पदावर जावे’

googlenewsNext

जालना: बालकामगार मुलांनी बालमजुरी सोडून शिक्षण घेवून मोठ्या पदावर जावे, आपल्या कामातून इतर बालकांसमोर आदर्श निर्माण करावेत, असे प्रतिपादन बाल न्यायमंडळाच अध्यक्षा तथा कनिष्ठ स्तरचे सह दिवाणी न्यायाधीश जे.एस.भाटीया यांनी आयोजित कार्यक्रमात केले.
जागतिक कामगार विरोधी दिनानिमित्त गुरूवारी राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पांतर्गत शंकर नगर येथील समाज कल्याण वसतिगृहाजवळून काढण्यात आलेल्या जनजागृती रॅलीची सुरूवात जिल्हाधिकारी ए.एस.आर.नायक यांनी हिरवा झेंडा दाखवून केली. या रॅलीची सांगता शनिमंदिर येथे झाली. या रॅलीमध्ये बालकामगार प्रथेविरूध्द व बालकामगार प्रतिबंध कायद्यातील पत्रकाचे वाटप करण्यात आले. या विद्यार्थ्यांनी घोषणावाक्याचे फलक हातात घेऊन नागरिकांचे लक्ष वेधले.
शंकरनगर येथील विशेष प्रशिक्षण केंद्रात बालकामगार विरोधी दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी नायक यांनी बालकामगार विद्यार्थ्यांशी चर्चा करून पुढील काळात शासकीय योजनांचा फायदा बालकामगार विद्यार्थ्यांना करून देण्यात येईल असे सांगितले.
प्रारंभी राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प संचालक मनोज देशमुख यांनी प्रास्ताविक केले.
या कार्यक्रमात सुमारे ३३५ विद्यार्थी व १७२ राष्ट्रीय बालकामगार, प्रकल्पातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा राठोड यांनी केले व क्षेत्रीय अधिकारी रेणुका चव्हाण यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास जिल्हा शल्य चिकित्सक प्रताप जाधव, जिल्हा कोषागार अधिकारी कल्याण औताडे, प्रकल्प संचालक मनोज देशमुख, डायटचे अधिव्याख्याता डॉ.विशाल तायडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती इंगळे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सतीश पंच, सीटूचे अध्यक्ष अण्णा सावंत, यांच्यासह सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
भाटीया यांचे आवाहन
प्रकल्पाच्या माध्यमातून शाळेच्या मुख्य प्रवाहात दाखल करून दहावी व बारावीच्या पुढे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी नायक यांच्या हस्ते शालेय साहित्य देवून सत्कार करण्यात आला.

Web Title: 'Child labor should go to a higher position'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.