शिशू कल्याण यात्रा ठरतेय आकर्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:04 AM2021-02-26T04:04:22+5:302021-02-26T04:04:22+5:30
सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ संचालित व विद्याभारती संलग्नित विहंग विशेष मुलांची शाळा व ओंकार बालवाडी यांच्या ...
सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ संचालित व विद्याभारती संलग्नित विहंग विशेष मुलांची शाळा व ओंकार बालवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मातृभाषा दिनानिमित्त शिशू कल्याण यात्रा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन २१ रोजी जि. प. च्या महिला व बालकल्याण सभापती अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते झाले. ॲड. माधुरी अदवंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
बालशिक्षणातील अनौपचारिक व बोधात्मक विकासासाठी पोषक ठरणारे खेळदेखील या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. प्रदर्शनातील खेळ मुलांचा बौद्धिक विकास निश्चितच उत्तम पद्धतीने करतील, असे मनोगत सभापती चव्हाण यांनी व्यक्त केले. ॲड. अदवंत यांनीही प्रदर्शनाचे कौतुक केले.
संदीप डफळे, डॉ. मधुश्री सावजी, डॉ. संजीव सावजी, आदिती शार्दुल यांच्यासह संस्थेच्या इतर पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. हे प्रदर्शन एक महिना दु. १ ते ४ यावेळेत सर्वांना बघण्यासाठी खुले आहे, असे मुख्याध्यापिका कीर्ती देशपांडे यांनी सांगितले.
फोटो ओळ :
विहंग विशेष मुलांची शाळा आणि ओंकार बालवाडी यांच्यावतीने आयोजित प्रदर्शन.