रंगोत्सवात उडविली बालकांनी धमाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 12:40 AM2018-03-02T00:40:09+5:302018-03-02T00:40:16+5:30
रंगीबेरंगी फेटे बांधलेल्या मुुला-मुलींनी एकामेकांना विविध रंगांत भिजवून धमाल-मस्ती केली. सवंगड्यांसोबत आयुष्यातील एक अविस्मरणीय रंगोत्सव साजरा केल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहºयावर दिसत होता. लोकमतचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा या रंगोत्सवात सहभागी झाल्याने बालकांचा आनंद आणखी द्विगुणित झाला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : रंगीबेरंगी फेटे बांधलेल्या मुुला-मुलींनी एकामेकांना विविध रंगांत भिजवून धमाल-मस्ती केली. सवंगड्यांसोबत आयुष्यातील एक अविस्मरणीय रंगोत्सव साजरा केल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहºयावर दिसत होता. लोकमतचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा या रंगोत्सवात सहभागी झाल्याने बालकांचा आनंद आणखी द्विगुणित झाला होता.
प्रसंग होता. लोकमत आधार युवा मंच औरंगाबाद आयोजित ‘रंगोत्सव-२०१८’चा. एन-४ येथील पारिजातनगर मैदानात गुरुवारी होळीच्या निमित्ताने सोमनाथ बोंबले यांनी रंगोत्सवाचे आयोजन केले होते. मैदानात विविध शाळांतील मुले-मुली सहभागी झाले होते. मंडपात बसलेल्या प्रत्येक मुलाला आवर्जून फेटा बांधण्यात येत होता. फेटे बांधल्याने मुलांचा आनंद गगनात मावत नव्हता. लोकमतचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा मैदानात आले व सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांचे स्वागत केले. राजेंद्र दर्डाही नंतर या मुलांमध्ये मिसळून गेले. मुलांना फुगे देत त्यांच्याशी संवाद साधला. यामुळे आनंदित झालेल्या मुलींनी तर ‘आयुष्याचे द्यावे उत्तर’ असे उत्स्फूर्तपणे सामूहिक गीत सादर करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. काही चिमुकल्यांनी सर्वप्रथम राजेंद्र दर्डा यांना रंग लावला आणि रंगोत्सवाला सुरुवात झाली. सर्व मुला-मुलींनी एकामेकांना कोरडा रंग लावत धमाल केली. अनेकांनी रंग हवेत उधाळला. आपापल्या मित्रांना-मैत्रिणींना रंगात पूर्ण नाहून टाकले. सजविलेल्या घोडागाडीतही मुलांनी सैर करून आनंद लुटला. रंगीत बर्फगोळा खाण्यासाठी तर अक्षरश: मुलांच्या उड्या पडल्या होत्या. रंगोत्सव खेळणे झाल्यावर सर्व मुला-मुलींनी जेवणाचा आस्वाद घेतला. ‘आजचा दिवस आम्ही कधी विसरू शकणार नाही,’ अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया मुलांनी व्यक्त केल्या. यात शोभना शिक्षण संस्था संचलित निराधार-निराश्रित बालगृह, स्वामी समर्थ बालगृह, वसंतराव नाईक बालगृह, गजानन बालगृह यांच्यासह पारिजातनगरमधील मुले-मुली सहभागी झाले होते.
या रंगोत्सवात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, खुशालचंद बाहेती, आर.आर.आबा फाऊंडेशनचे विनोद पाटील, माजी नगरसेवक अभिजित देशमुख, अग्रवाल सभाचे अध्यक्ष डॉ. सुशील भारुका, मनोज भंडारी, गुरविंदर फुटेजा, किरण शेट्टी, सचिन देशमुख यांनीही एकामेकांना रंग लावून धमाल उडवून दिली. रंगोत्सव यशस्वीतेसाठी मंदार जोशी, सदाशिव बोंबले, विजय वाहूळ, प्रीतेश कोठावाला, बाळू औताडे, प्रकाश तिलघर, स्मिता बोंबले, मनीषा बोंबले, सुरेश भोसले, कीर्ती उढाण, डॉ. तेजस्विनी सराफ, दीपाली सरपटे यांनी परिश्रम घेतले.
अनिष्ट प्रथा, वाईट प्रवृत्तींचा होळीत नाश करा -राजेंद्र दर्डा
होळी का साजरी करतात, याची माहिती देत राजेंद्र दर्डा यांनी अनिष्ट प्रथा, वाईट प्रवृत्तींचा या होळीत नाश करा, असे आवाहन मुला-मुलींना केले. यानंतर मुलींनी आरती करीत होळी पेटविली. वाईट प्रवृत्तींच्या विरोधात यावेळी बोंबा मारण्यात आल्या.