खेळाविना लहान मुले झाली मोटू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:02 AM2021-07-04T04:02:11+5:302021-07-04T04:02:11+5:30

-साहेबराव हिवराळे- औरंगाबाद : कोरोनामुळे मुलांच्या आहारात बदल झाला असून, कित्येक तास टीव्ही बघणे आणि खाणे दोनच कामे सुरू ...

Children grow up without playing | खेळाविना लहान मुले झाली मोटू

खेळाविना लहान मुले झाली मोटू

googlenewsNext

-साहेबराव हिवराळे-

औरंगाबाद : कोरोनामुळे मुलांच्या आहारात बदल झाला असून, कित्येक तास टीव्ही बघणे आणि खाणे दोनच कामे सुरू आहेत. मैदानासह खेळात खंड पडल्यामुळे लहान मुले मोटू झाली आहेत.

ऑनलाइन शाळा सुरू झाल्यामुळे पालकांनाही ताण वाढला असून, चिमुकल्यांच्या अभ्यासाचा सराव पालकांनाच जास्त करावा लागत आहे. मोबाइलवर बालकांची नजर खिळली आहे. अभ्यासाच्या नावाखाली मोबाइलवर कार्टून पाहणे हा उद्योग जोमाने सुरू झाला आहे. लेकरू अभ्यास करत आहे, असा पालकांना समज होतो. पालकही मुलांच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत काही कमी करत नाही. त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. मुलांतील चपळता घटली असून, वजन मात्र वाढले आहे. टीव्हीसमोर कित्येक तास बसणाऱ्या मुलांत अभ्यासाची गोडी कमी झाली. मुलांना अभ्यासाचा धाक राहिलेला नाही.

वजन वाढण्याची कारणे....

-शाळेतील लंच ब्रेक बंद झाला असून, जेव्हा मनाला वाटेल तेव्हा मुले जेवण करीत आहेत. मसालेदार पदार्थांपासून फॅट वाढवणारे पदार्थ लहान मुलं अधिक खात आहेत.

-अभ्यासाच्या नावाखाली टीव्ही पाहणे, मोबाइलवर मनोरंजक खेळ पाहणे, असा बालकांचा उपक्रम सुरू आहे.

-मैदानी खेळ कोरोनामुळे मुले विसरली आहेत, संसर्ग होऊ नये म्हणून पालकही मुलांना मैदानात जाऊ देत नाहीत.

मुले टीव्ही, मोबाइल सोडत नाहीत.....

लॉकडाऊनमुळे मुले घरीच आहेत. अभ्यासाच्या नावाखाली आई-वडिलांचे मोबाइल घेऊन मुले कार्टून पाहतात तसेच गेम खेळतात. मुलं ऐकतच नाहीत. त्यांच्याकडून मोबाइल काढून घेतला की, अभ्यास न करण्याची धमकी देतात.

- संदीप खरात (पालक)

-----------

-अभ्यासात लक्ष लागत नाहीत, टीव्ही, मोबाइल, लॅपटॉप, टॅब्लेटवर सोशल अकाउंट हाताळण्याचे उपद्रवी प्रकार देखील होत आहेत. अभ्यासाकडे पाहण्याचा दृष्टिकोणही बदलला आहे.

-अलमनूर पठाण (पालक)

----------------

वजन कमी करण्यासाठी काय करावे.....

-शारीरिक गुणवत्ता राखण्यासाठी नियमित व्यायाम करणे महत्त्वाचे आहे.

-आहारावर नियंत्रण ठेवावे, फॅट वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे टाळावे. जेवणात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असावा.

-जास्त टीव्ही पाहिल्याने तसेच एका जागी बसून राहण्यामुळे शारीरिक व्याधी वाढतात व वजन वाढते. त्यामुळे शरीराच्या हालचाली होणे गरजेचे आहे.

-

(डमी878)

Web Title: Children grow up without playing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.