मुलांनी पाहिली ....‘लोकमत’ची छपाई

By Admin | Published: July 7, 2016 11:48 PM2016-07-07T23:48:16+5:302016-07-07T23:56:07+5:30

अनेक प्रश्न बालमनाला पडत असतात. अखेर या सर्व प्रश्नांचे लवकरच ‘लोकमत’तर्फे निरसन करण्यात आले.

Children watched .... 'Lokmat' printing | मुलांनी पाहिली ....‘लोकमत’ची छपाई

मुलांनी पाहिली ....‘लोकमत’ची छपाई

googlenewsNext

औरंगाबाद : आपला आवडता ‘लोकमत’ तर रोज भल्या पहाटे आपल्या घरात येत असतो; पण हा पेपर तयार कसा होतो? त्यावर छपाई कशी केली जाते, पेपरवरचे अक्षर रोजच्या रोज सारखेच कसे काय बुवा? असे अनेक प्रश्न बालमनाला पडत असतात. अखेर या सर्व प्रश्नांचे लवकरच ‘लोकमत’तर्फे निरसन करण्यात आले. निमित्त होते शालेय विद्यार्थ्यांच्या प्रेस व्हिजिटचे.
नुकतेच शालेय विद्यार्थ्यांना वृत्तपत्र छपाईचे कार्य कसे चालते, याची सफर घडविण्यात आली. शेंद्रा एमआयडीसीमधील ‘लोकमत’चे छपाई युनिट शनिवारी सकाळी चिमुकल्यांच्या किलबिलाटाने बहरून गेले होते. वृत्तपत्रांची छपाई कशी काय होते, हे कुतूहल भरल्या नजरेने बालके प्रत्येक यंत्र निरखून पाहत होती. अशातच प्रिंंटिंग प्रेसचा खडखडाट सुरू झाला आणि जमलेल्या बच्चेकंपनीने टाळ्यांचा एकच कडकडाट केला. शहरातील विविध शाळांच्या पाच हजारांपेक्षाही जास्त विद्यार्थ्यांनी छपाईचे कामकाज प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले. याप्रसंगी लोकमतचे सहायक उपाध्यक्ष संदीप विश्नोई यांची प्रमुख उपस्थिती होती.
कागदावर अक्षरे कशी उमटतात, या अक्षरांचा आकार कसा ठरवला जातो, वर्तमानपत्राची यंत्राच्या साहाय्याने कशी घडी घातली जाते, अशा अनेक प्रश्नांची उकल झाली. कुतुहलापोटी तंत्रज्ञांनाही विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले. मुले उत्सुक तेने वर्तमानपत्र हातात घेऊन पाहत होती. निर्मिती व्यवस्थापक प्रशांत गिते व मधुकर आगलावे यांनी विद्यार्थ्यांना प्रिंटिंग प्रेसमध्ये चालणारे कामकाज समजावून सांगितले. ‘लोकमत’चे वितरण व्यवस्थापक प्रमोद मुसळे, उपव्यवस्थापक सोमनाथ जाधव, शिरीष घायाळ आदींची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांसाठी खास जादूचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. जादूचे नवीन प्रयोग पाहून विद्यार्थी अचंबित झाले. कठपुतळीच्या नृत्याचाही मुलांनी आनंद लुटला.
‘लोकमत’मुळे उत्सुकता पूर्ण...
पेपर आमच्या घरात येतो, पण तो कसा तयार होतो, याची आम्हाला माहिती नव्हती. आमच्या ज्ञानात भर टाकणारी माहिती आज आम्हाला मिळाली, अशी प्रतिक्रिया अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. तर मुलांना वृत्तपत्र छपाईबद्दलची असणारी उत्सुकता आज ‘लोकमत’मुळे पूर्ण झाल्याचे मत शिक्षकांनी व्यक्त केले.

Web Title: Children watched .... 'Lokmat' printing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.