अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाचा खून, माय-लेकी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 11:54 PM2018-01-28T23:54:45+5:302018-01-28T23:55:30+5:30

बापू सोळुंके । लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाचा दोन दिवसांनंतर खून केल्यानंतर मृतदेह फेकून देणाºया ...

The child's blood born in immoral bonds, My-laki Gazaad | अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाचा खून, माय-लेकी गजाआड

अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाचा खून, माय-लेकी गजाआड

googlenewsNext
ठळक मुद्देएमआयडीसी वाळूज पोलिसांची कामगिरी : संशयित बापही पोलिसांच्या ताब्यात

बापू सोळुंके ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाचा दोन दिवसांनंतर खून केल्यानंतर मृतदेह फेकून देणाºया निर्दयी माय-लेकीला पकडण्यात एमआयडीसी वाळूज पोलिसांना यश आले. विशेष म्हणजे त्या महिलेशी अनैतिक संबंध ठेवणाºया तरुणालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
वाळूज एमआयडीसीमधील एका कंपनीजवळ दोन दिवसांच्या बालिकेचा मृतदेह २४ जानेवारी रोजी रात्री आढळला होता. राहुल नावाच्या कामगाराने ही बाब सामाजिक कार्यकर्त्या आणि पोलिसांना कळविली. एमआयडीसी वाळूज पोलिसांनी मृत अर्भक ताब्यात घेऊन घाटीत हलविले. अज्ञात मातेविरुद्ध गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. शवविच्छेदन अहवालात त्या बाळाचा गळा घोटून खून करण्यात आल्याचे घाटीतील डॉक्टरांनी नमूद केले. त्यामुळे अज्ञात मातेविरुद्ध खुनाचे कलम लावण्यात आले. पोलीस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक आयुक्त ज्ञानोबा मुंढे यांना माहिती देऊन पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख यांनी तपासाला गती दिली.
खबºयांना कामाला लावण्यात आले. अंगणवाडी सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि विविध प्रसूती केंद्राच्या डॉक्टरांशी संपर्क साधून चार दिवसांत प्रसूती झालेल्या महिलांची नावे आणि पत्ते मिळविले. तांत्रिक माहिती आणि खबºयाची मदत घेऊन त्या बाळाला यमसदनी पाठविणाºया माय-लेकीपर्यंत पोलीस पोहोचले. अधिक चौकशीअंती अनैतिक संबंधातून हे बाळ जन्मल्याचे समोर आले. अनैतिक संबंध ठेवणाºया तरुणाचाही पोलिसांनी रविवारी शोध घेतला. त्यास ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी सुरू केली.

Web Title: The child's blood born in immoral bonds, My-laki Gazaad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.