शिवना, भराडी, फर्दापुरात उभारणार मिरची शीतगृह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:05 AM2021-07-20T04:05:36+5:302021-07-20T04:05:36+5:30
सिल्लोड : तालुक्यातील शिवना, भराडी व सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथे मिरची साठवण शीतगृह प्रकल्प उभारला जाणार आहे, यासाठी प्रशासकीय ...
सिल्लोड : तालुक्यातील शिवना, भराडी व सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथे मिरची साठवण शीतगृह प्रकल्प उभारला जाणार आहे, यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. सिल्लोड-सोयगाव तालुक्यातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर जात सत्तार यांनी सोमवारी (दि.१९) शेतकऱ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी व शेतमजुरांनी बचत गट स्थापन करावे, असे आवाहनही सत्तार यांनी केले.
दिवसेंदिवस तालुक्यात मिरची लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. येथील मिरचीला बाजारात चांगली मागणीदेखील आहे; परंतु एकाच वेळी बाजारात मिरची दाखल झाल्यानंतर त्याला योग्य तो भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यावेळी मिरची साठवणीसाठी शिवना, भराडी व फर्दापूर शिवारात कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत शीतगृह उभारले जाणार आहे. जेणेकरून मिरचीची भाववाढ होताच शेतकरी तो माल थेट विक्री करू शकतो. हिरव्या मिरचीचा पावडर प्रक्रिया प्रकल्पदेखील उभारला जाणार आहे, असे सत्तार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख देवीदास लोखंडे, डॉ. संजय जामकर, कृउबा समितीचे सभापती अर्जुन गाढे, संचालक दामूअण्णा गव्हाणे, राजेंद्र ठोंबरे, राजूमिया देशमुख उपस्थित होते.
190721\img-20210719-wa0335.jpg
क्याप्शन
शिवना येथे मिर्ची च्या शेतात जाऊन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मिरची उत्पादक व मजुरांची भेट घेतली.