चंद्रावर चीनने फडकविला झेंडा
By | Published: December 6, 2020 04:05 AM2020-12-06T04:05:08+5:302020-12-06T04:05:08+5:30
बीजिंग : कोरोना साथीमुळे जगाच्या टीकेला सामोरे जाणाऱ्या चीनने चंद्रावर आपला झेंडा रोवला आहे. ही यशस्वी मोहीम करणारा चीन ...
बीजिंग : कोरोना साथीमुळे जगाच्या टीकेला सामोरे जाणाऱ्या चीनने चंद्रावर आपला झेंडा रोवला आहे. ही यशस्वी मोहीम करणारा चीन हा जगातील दुसरा देश बनला आहे. चीनच्या अंतराळ एजन्सीने सांगितले की, चिनी स्पेसक्राफ्टने चांग ई- ५ ने चिनी झेंडा चंद्रावर फडकाविला आहे.
स्पेसक्राफ्ट चांग ई-५ हे चंद्रावरील नमुने घेऊन पृथ्वीकडे निघाले आहे. चिनी अंतराळ एजन्सीकडून सांगण्यात आले की, चांग ई-५ ने चंद्रावरून टेक ऑफ करण्यापूर्वी चीनचा झेंडा चंद्रावर फडकविला. चांग ई-५ हे चंद्रावर पोहोचलेले चीनचे तिसरे अंतराळ यान आहे. १७ डिसेंबरपर्यंत स्पेसक्राफ्ट चंद्रावरून माती घेऊन पृथ्वीवर परत येईल. चंद्रावरून माती आणण्याचे काम यापूर्वी अमेरिका आणि रशिया यांनी १९६० ते ७० च्या दशकात केले होते. चीनचे यान अशा जागेवर उतरले होते जिथे आजपर्यंत कुणीही पोहोचलेले नाही.
चांग ई-५ ने २३ नोव्हेंबर रोजी रात्री साऊथ चायनातून उड्डाण घेतले होते. हे यान चंद्राच्या त्या भागात उतरले होते जिथे कोट्यवधी वर्षांपूर्वी ज्वालामुखी होते. हा चंद्राचा उत्तर - पश्चिम भाग आहे. १९७६ मध्ये अमेरिकी अंतराळ एजन्सी नासाने अपोलो मिशनच्या माध्यमातून चंद्रावरील नमुने आणले होते.
..........