पुन्हा घुमू लागले ‘चिअर्स’चे बोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 12:28 AM2017-09-10T00:28:35+5:302017-09-10T00:28:35+5:30
ज्य उत्पादन शुल्कच्या बिलोली उपविभागांर्तगत येणाºया पाच तालुक्यांतील ५० परमिट रुममध्ये पुन्हा ‘चिअर्स’ चे बोल सुरु झाले. मागील साडेपाच महिन्यांपासून परमिट रुम बंद होते.
राजेश गंगमवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बिलोली : राज्य उत्पादन शुल्कच्या बिलोली उपविभागांर्तगत येणाºया पाच तालुक्यांतील ५० परमिट रुममध्ये पुन्हा ‘चिअर्स’ चे बोल सुरु झाले. मागील साडेपाच महिन्यांपासून परमिट रुम बंद होते. दरम्यान, देशी दारुसाठी नवीन नियमावली झाल्याने अशा अनुज्ञाप्तीधारकांना अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या सुधारित आदेशानंतर ४ सप्टेंबर रोजी राज्य शासनाने नवा आदेश जारी करुन पालिका आणि नगरपंचायत क्षेत्रात मद्यविक्रीची अनुमती दिली. या अनुषंगाने ६ सप्टेंबरपासून परवाना नूतनीकरणास प्रारंभ झाला.
बिलोली राज्य उत्पादन शुल्क विभागात पाच तालुके मोडतात. ज्यात बिलोली, नायगाव, धर्माबाद, उमरी, भोकर व कुंडलवाडी अशा ६ पालिकांचा समावेश आहे. यापूर्वी राज्य महामार्गवर व पालिका क्षेत्रासह परमिट रुम, देशी दारु, बिअर शॉपी असे जवळपास १०० ची संख्या होती. आता महामार्गावर २२० मीटर लांबीचा नियम असल्याने पाच तालुक्यांतील ९५ टक्के परवाने रद्द झाले होते. साडेपाच महिन्यांनंतर परवानगी मिळाल्याने घाऊक व किरकोळ परवानाधारकांच्या चेहºयावर स्मितहास्य पसरले आहे.
मधल्या काळात राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारीही कामाअभावी थंड होते. आता परवाने नूतनीकरण सुरु करण्यात आल्याने संबंधितांना काम मिळाले. बिलोली, नायगाव तालुकातंर्गत १५ परवाने सुरु झाल्याची माहिती उपनिरीक्षक बी. एस. मंडलवार यांनी दिली. धर्माबाद, उमरी, भोकर या तीन तालुक्यांत ३५ परवाने नूतनीकरण झाल्याचे उपनिरीक्षक ए. एन. पठाण यांनी सांगितले. ज्या देशी दारु दुकानांकडे व्यावसायिक अकृषिक परवाना आहे, अशांचे अनुज्ञाप्तीधारक सुरु झाले, ज्यात २ ते ३ चा समावेश आहे. एकूणच बिलोली उपविभागातंर्गत ५० परमिट रुममध्ये ‘चिअर्स’चे बोल घुमू लागले आहेत.