Chitra Wagh : उच्च प्रतीच्या गांज्याची नशा उतरल्याचं अजून दिसत नाही, चित्रा वाघ यांचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 05:33 PM2021-10-21T17:33:24+5:302021-10-21T17:34:08+5:30
चित्रा वाघ यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच, राज्याचे माजी गृहमंत्रीच फरार आहेत, त्यामुळे याप्रकरणातील आरोप कधी सापडतील हाही प्रश्न आहे, पोलिसांना यश यावो, हे आरोपी लवकरात लवकर सापडो,
औरंगाबाद - बीडकीनपासून काही अंतरावर असलेल्या तोंडोळी शिवारातील शेतमजुराच्या वस्तीवर मंगळवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडा पडला. दरोडेखोरांनी मजुरांच्या घरात घुसून शस्त्राने पुरूषांना अमानुष मारहाण करत दोन महिलांवर अत्याचार ( Robbers rape on two women) केल्याची संतापजनक घटना घडली आहे. मारहाणीत जखमी झालेल्या मजुरांना उपचारासाठी पोलिसांनी रूग्णालयात हलवले असून आरोपीच्या शोधासाठी नाकाबंदी करण्यात आली आहे. दरोडा व अत्याचाराच्या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी, राज्य सरकारवर निशाणा साधला.
चित्रा वाघ यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच, राज्याचे माजी गृहमंत्रीच फरार आहेत, त्यामुळे याप्रकरणातील आरोप कधी सापडतील हाही प्रश्न आहे, पोलिसांना यश यावो, हे आरोपी लवकरात लवकर सापडो, अशी अपेक्षा वाघ यांनी व्यक्त केली. तसेच, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर नाव न घेता टीका केली. राज्यात मोघलाई, निजामशाही अवतरल्याची भावना सगळ्यांची आहे, वेगवेगळ्या विषय़ांवर ज्ञान झाडणारे सर्वज्ञानी, यांना उच्च प्रतीच्या गांजाची नशा अजून उतरल्याचं दिसत नाही. कारण, त्यांच्यापर्यंत अजून ही औरंगाबादची घटना पोहोचलेली दिसत नाही. प्रत्येकवेळेला, ज्यावेळी आम्ही महिलांवरील अत्याचारावर बोलतो, त्यावर विरोधकांचे थोबाड फोडा, असे म्हणणारे सर्वज्ञानी यावर अजून का बोलले नाहीत, असा प्रश्न चित्रा वाघ यांनी विचारला आहे.
औरंगाबाद पैठणतालुका तोंडोळी गावच्या घटनेवरून आपण निजामाच्या राजवटीत राहतोय का हा प्रश्न पडलाय
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 21, 2021
ओल्या बाळंतीणवर बलात्कार..
गर्भवतीवर अत्याचार..
दरोडेखोर मोकाट..
उरला नाही कायद्याचा धाक..
‘शिवशाही’चं वचन देणा-यांनी ‘निजामशाही’ आणलीय @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@BJP4Maharashtrapic.twitter.com/L0v1uJdJun
8 ते 10 दरोडेखोरांनी केला हल्ला
तोंडोळी शिवारातील गट क्रमांक ३१२ मधील शेतवस्तीवर बीहार राज्यातील मजुर घर करून राहतात. मंगळवारी मध्यरात्री शेतवस्तीवर ८ ते १० दरोडेखोरांनी हल्ला केला. पुरुषांना शस्त्राने जबर मारहाण करत लुटमार केली... एवढेच नव्हे तर घरातील एक महिला व तरूणीवर अमानुष बलात्कार केला. यानंतर दरोडेखोर निघून गेले. घटनेतून सावरत एका मजुराने ही माहिती गावात फोन करून सांगितली. तोंडोळीचे सरपंच संजय गरड यांनी पोलीस पाटलासह वस्तीवर जाऊन पिडीत कुटुंबाला धीर दिला.