छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘चोरी चोरी चुपके चुपके’ कोकेन, ब्राऊन शुगर, चरसची ‘कश’

By संतोष हिरेमठ | Published: June 26, 2023 01:17 PM2023-06-26T13:17:40+5:302023-06-26T13:17:55+5:30

छत्रपती संभाजीनगरात वाढतेय नशेखोरी : स्वस्त, सहज उपलब्ध होणाऱ्या पदार्थासह महागड्या पदार्थांचीही नशा

'Chori Chori Chupke Chupke' Cocaine, Brown Sugar, Charas 'Kash' in Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘चोरी चोरी चुपके चुपके’ कोकेन, ब्राऊन शुगर, चरसची ‘कश’

छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘चोरी चोरी चुपके चुपके’ कोकेन, ब्राऊन शुगर, चरसची ‘कश’

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये नशेखाेरी दिवसेंदिवस वाढत आहे. मद्यपान, गांजापाठोपाठ नशेसाठी स्टिक फास्ट, झोपेच्या गोळ्यांचे सेवन तर वाढतच आहे. परंतु शहरातील तरुणाई कोकेन, ब्राऊन शुगर, चरसच्या विळख्यात सापडत आहे. उपचार घेऊन काहीजण वेळीच सावरतात. तर काहीजण स्वत:सह कुटुंबही उद्ध्वस्त करीत असल्याची चिंताजनक परिस्थिती आहे.
शहरात मनोविकारतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञांकडे सुमपदेशनासाठी, उपचारांसाठी कोणकोणत्या पदार्थांचे व्यसन करणारे रुग्ण येतात, याची माहिती ‘लोकमत’ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा नशेसाठी

सहज उपलब्ध असलेल्या व्हाइटनर, बूट पॉलिशसाठी वापरले जाणारे पॉलिश, स्टिकफास्ट, आयोडेक्स, नेलपेंट, अगदी पेट्रोलचाही नशेसाठी वापर केला जात असल्याचे मनोविकारतज्ज्ञांनी सांगितलेच. परंतु, त्याबरोबर ब्राउन शुगर, चरस कोकेन, एमडी अशा अंमली पदार्थांची नशा करणेही रुग्ण येत असल्याचे सांगण्यात आले. शहरातील अडगळीत पडलेली ठिकाणे ही अशा प्रकारची नशा करण्याची अड्डा बनली आहेत. अल्पवयीन मुले बळी पडत असल्याने चिंता वाढली आहे.
घाटीतील मनोविकृतीशास्त्र विभागातील स्थिती

व्यसनाचा प्रकार - महिन्याला साधारण रुग्ण- वर्षाला साधारण रुग्ण
१) झोपेच्या गाळ्या- ४-४५
२) गांजा- ४-४८
३) स्टिक फास्ट-५-६०
४) सिगोरट- १५-१८०
५) तंबाखू-२५-३००

कुटुंबीयांची भूमिका महत्त्वाची
कुटुंबाची यात महत्त्वाची भूमिका ठरते. पालकांनी पाल्यांशी मैत्रीपूर्ण संवाद साधणे, छंद जोपासण्यासाठी प्रोत्साहित करणे, इंटरनेटच्या वापरावर मर्यादा ठेवणे आणि गरज असेल तर समुपदेशनाची मदत घेणे गरजेचे ठरते.
- डाॅ. शलाका व्यवहारे, समाजसेवा अधीक्षक (मनोविकृती), घाटी

आठवडाभरात एक तरी चरस, ब्राऊन शुगरचा रुग्ण
आठवडाभरात चरस, ब्राऊन शुगरचे व्यसन असलेला एक तरी रुग्ण येतो. तर कोकेनचे व्यसन असलेला रुग्ण चार ते पाच महिन्यांत एखादा येतो. झोपेच्या गोळ्या, स्टिक फास्ट, पेट्रोलची नशा करणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
- डाॅ. मेराज कादरी, मनोविकारतज्ज्ञ

या पदार्थांची इच्छा, ही मनोविकृती
नशेसाठी विविध पदार्थांची इच्छा होते, याचा अर्थ ती मनोविकृती आहे. आनंद वाटावा म्हणून आणि इतर कारणांनी झोपेच्या गोळ्यांसह विविध पदार्थांचे सेवन केले जाते. परंतु, यापेक्षा फॅमिली डाॅक्टर अथवा मनोविकारतज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे ठरेल.
- डाॅ. प्रसाद देशपांडे, मनोविकृतीशास्त्र विभाग, घाटी.

ड्रग्सचे इंजेक्शन घेणारेही
आजकाल अंमली पदार्थांचे व्यसन करणारे रोज एक किंवा दोन नवीन रुग्ण येतात. तरुणांचे प्रमाण त्यात सर्वाधिक आहे. दारू आणि तंबाखू व्यतिरिक्त गांजा, हुक्काचे प्रमाण सर्वांत जास्त आहे. ड्रग्सचे इंजेक्शन घेणारेही अधूनमधून येतात.
- डॉ. अमोल देशमुख, मनोविकारतज्ज्ञ.

Web Title: 'Chori Chori Chupke Chupke' Cocaine, Brown Sugar, Charas 'Kash' in Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.