वाळूज महानगरात ख्रिसमस उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 08:47 PM2018-12-25T20:47:30+5:302018-12-25T20:47:49+5:30
वाळूज महानगर परिसरात मंगळवारी ख्रिश्चन धर्मिय समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात ख्रिसमस सण साजरा करुन प्रभू येशु ख्रिस्ताचे नामस्मरण केले. यावेळी विविध चर्चमध्ये विशेष प्रार्थनेसह विविध कार्यक्रम घेण्यात आले.
वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरात मंगळवारी ख्रिश्चन धर्मिय समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात ख्रिसमस सण साजरा करुन प्रभू येशु ख्रिस्ताचे नामस्मरण केले. यावेळी विविध चर्चमध्ये विशेष प्रार्थनेसह विविध कार्यक्रम घेण्यात आले.
ख्रिसमस सणा निमित्त सकाळपासूनच ख्रिचन धर्मिय बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. नवीन कपडे परिधान करुन समाजबांधव चर्चच्या दिशने जात होते. सांताक्लॉजच्या वेशभूषेतील रंगीबेरंगी पेहरावातील लहान मुले सर्वाचे लक्ष वेधून घेत होते. परिसरातील जोगेश्वरी, बजाजनगर, वाळूज, छत्रपतीनगर येथील चर्चमध्ये सकाळी १० वजाता सामूहिक प्रार्थना घेण्यात आली. जोगेश्वरी येथील नवजीवन प्रार्थना भवन चर्चमध्ये प्रार्थना झाल्यानंतर स्किट (मुक अभिनय) सादरीकरण करुन प्रभू येशु ख्रिस्त जन्मसोहळा दाखविण्यात आला. उपस्थिताना अल्पोपहार देवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी अरुण कोतकर, सतिश आठवले, आरती कोतकर, दिपक अंभोरे, भारती पगारे, राणी ताकवाले, सिंधुताई अहिरे, प्रकाश अमोनिक आदींसह समाज बांधवांची उपस्थिती होती. छपतीनगर येथे ख्रिस्त आनंद मिशन चर्चतर्फे येशु ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करुन लहान मुलांसाठी विविध खेळ घेवून त्यांना पारितोषिक व भेटवस्तू देण्यात आल्या. यासाठी नितिन त्रभुवन, सरोज त्रिभुवन, बाबासाहेब जगधने, पिराजी जाधव, कल्याण वैराळ, सुरेखा जगधने, जयश्री जाधव, निलेश बत्तिसे, सुरेखा वैराळ, अंकुश कांबळे, योगेश वाघमारे आदींनी परिश्रम घेतले.