खाजगी गटनंबरमध्ये प्लॉट खरेदी न करण्याचे सिडकोचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 06:04 PM2018-11-01T18:04:26+5:302018-11-01T18:04:54+5:30

वाळूज महानगर : सिडको अधिसूचित क्षेत्रात समाविष्ठ असलेल्या गावातील खाजगी गट नंबरमध्ये घरे व प्लॉट खरेदी करताना सर्वसामान्यांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे खाजगी गटनंबरमध्ये घरे व प्लॉट खरेदी करु नका, असे आवाहन सिडको प्रशासनाने केले आहे. सिडकोने सातबारा व नमुना नं. ८ - अ चे उतारे पाहून कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून, काही लोक व ग्रामपंचायत रडारवर असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

 CIDCO appeals to not buy plots on illigal land | खाजगी गटनंबरमध्ये प्लॉट खरेदी न करण्याचे सिडकोचे आवाहन

खाजगी गटनंबरमध्ये प्लॉट खरेदी न करण्याचे सिडकोचे आवाहन

googlenewsNext

वाळूज महानगर : सिडको अधिसूचित क्षेत्रात समाविष्ठ असलेल्या गावातील खाजगी गट नंबरमध्ये घरे व प्लॉट खरेदी करताना सर्वसामान्यांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे खाजगी गटनंबरमध्ये घरे व प्लॉट खरेदी करु नका, असे आवाहन सिडको प्रशासनाने केले आहे. सिडकोने सातबारा व नमुना नं. ८ - अ चे उतारे पाहून कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून, काही लोक व ग्रामपंचायत रडारवर असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

सिडको अधिसूचित क्षेत्रात येणाऱ्या खाजगी जमिनीवर काही लोकांनी घरे व प्लॉट खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरु केला आहे. तेथे सिडकोच्या परवानगी शिवाय खरेदी-विक्री व बांधकाम करता येत नाही. पण काही लोकांनी स्थानिक ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधीसह अधिकाºयांना हाताशी धरुन लेआऊट मंजूर करुन घेतली आहे.

सिडकोच्या परवानगी विनाच खुल्या प्लॉटची व घराची विक्री सुरु केली आहे. विशेष म्हणजे घराची स्थानिक ग्रामपंचायतीकडे नोंद करुन ८ - अ चे उतारेही घेतल्याचे उघडकीस येत आहे. मात्र, सिडकोने सदरील घरे व प्लॉट अनधिकृत असल्याचे जाहीर करुन कारवाईचा बडगा उगारला आहे.

या विषयी सिडकोचे मालमत्ता अधिकारी गजानन साटोटे म्हणाले की, या विषयी आम्ही संबंधित लोक व प्लॉटधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, या संदर्भात कुणीही खुलासा सादर न केल्यामुळे ज्यांची नियमबाह्य रजिस्ट्री झालेली आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करुन लवकरच गुन्हे दाखल केले जातील.

या गटनंबरमध्ये घरे व प्लॉट घेवू नका
सिडको प्रशासनाने अधिसूचित क्षेत्रात येणाºया वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक ३, ४, ५, ७, ८, ९, १०, ११, १२ व शरणापूर ग्रामपंचायत हद्दीतील शेकापूर (उढाण) येथील गट क्रमांक ५ व ६ मध्ये भूखंड अथवा जमीन सिडकोच्या परवानगीशिवाय न घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. याविषयी तहसीलदार व दुय्यम निबंधक यांनाही या भागातील खरेदी-विक्रीची नोंद न घेण्याचे कळविले आहे.

अधिकाºयांकडून पाहणी
सिडकोचे मुख्य प्रशासक मधुकर आर्दड यांनी पथकासह या भागाची पाहणी केली. यात अनधिकृत भूखंड खरेदी-विक्री व्यवहार व बांधकाम सुरु असल्याचे दिसून आले. याच बरोबर रजिस्ट्री व नमुना नं. ८ अ चे उतारे मिळून आले. त्यामुळे प्रशासनाने सातबारे व नमुना नं. ८ अ चे उतारे जमा करुन दोषींविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title:  CIDCO appeals to not buy plots on illigal land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.