सिडको अभियंत्याला महिलांचा घेराव  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 08:20 PM2019-01-22T20:20:16+5:302019-01-22T21:44:25+5:30

छत्रपतीनगरालगत साचलेल्या ड्रेनेज व सांडपाण्याची पहाणी करण्यासाठी आलेल्या सिडको अभियंत्याला महिलांनी मंगळवारी घेराव घालून याचा जाब विचारला.

CIDCO engineer is surrounded by women | सिडको अभियंत्याला महिलांचा घेराव  

सिडको अभियंत्याला महिलांचा घेराव  

googlenewsNext

वाळूज महानगर : छत्रपतीनगरालगत साचलेल्या ड्रेनेज व सांडपाण्याची पहाणी करण्यासाठी आलेल्या सिडको अभियंत्याला महिलांनी मंगळवारी घेराव घालून याचा जाब विचारला. दरम्यान, साचलेले ड्रेनेज व सांडपाणी झिरपून बोअरवेलच्या पाण्यात मिसळत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.


सिडको प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी न घेताच ड्रेनेजलाईनचे काम सुरु केले होते. नुकताच केलेला सिमेंट रस्ता तोडून हे काम होत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम अडविले आहे. ड्रेनेजलाईनचे काम रखडल्याने सिडकोच्या सोसायटीचे ड्रेनेज व सांडपाणी छत्रपतनीगरमध्ये साचत आहे. त्यामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मंगळवारी दुपारी सिडकोचे अभियंता दिपक हिवाळे हे पथकासह ड्रेनेज व सांडपाण्याच्या पाहणीसाठी आले असता त्यांना महिलांनी घेराव घातला.
 

Web Title: CIDCO engineer is surrounded by women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.