सिडकोला आता मिळणार पाचव्या दिवशी पाणी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 04:41 PM2019-07-10T16:41:45+5:302019-07-10T16:43:57+5:30

मनपाच्या नियोजनाचे यश

CIDCO to get water on fifth day ... | सिडकोला आता मिळणार पाचव्या दिवशी पाणी...

सिडकोला आता मिळणार पाचव्या दिवशी पाणी...

googlenewsNext
ठळक मुद्देपाण्यासाठी चार महिन्यांत किमान १०० पेक्षा अधिक आंदोलने झाली. शहरातील अनेक वॉर्डांना पाचव्या दिवशीसिडको-हडकोला आठव्या दिवशी पाणी मिळत असे

औरंगाबाद : सिडको-हडकोसह चिकलठाण्यापर्यंतच्या अनेक वॉर्डांना मागील काही महिन्यांपासून चक्क आठव्या, दहाव्या दिवशी पाणी देण्यात येत होते. या भागातील नागरिकांची प्रचंड ओरड लक्षात घेऊन मनपाचे शहर अभियंता एस.डी. पानझडे यांनी अत्यंत सूक्ष्म नियोजन केले. त्यामुळे सोमवारी मध्यरात्री सिडको एन-५, एन-७ आणि चिकलठाणा येथील जलकुंभ अनेक वर्षांनंतर प्रथमच तुडुंब भरले. या चमत्कारामुळे सिडको-हडकोला आता पाचव्या दिवशी पाणी देणे सहज शक्य होणार आहे.

सिडको-हडको आणि जालना रोडवरील काही वॉर्डांना यंदा उन्हाळ्यात प्रचंड त्रास सहन करावा लागला. पाण्यासाठी चार महिन्यांत किमान १०० पेक्षा अधिक आंदोलने झाली. पावसाळा सुरू झाला तरी या भागातील पाणी प्रश्न जशास तसा होता. अखेर राज्यमंत्री अतुल सावे यांनी या प्रकरणात लक्ष घातले. मनपा आयुक्तांची भेट घेऊन समान पाणी वाटपाची सूचना त्यांनी केली. शहरातील अनेक वॉर्डांना पाचव्या दिवशी पाणी तर सिडको-हडकोला आठव्या दिवशी पाणी का? असा प्रश्न सावे यांनी उपस्थित  केला होता. मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी दोन दिवसांत नियोजन करण्याचे आश्वासन दिले होते.

शहर अभियंता एस.डी. पानझडे यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची सूचना आयुक्तांनी केली होती. मागील चार ते पाच दिवसांपासून पानझडे यांनी सूक्ष्म नियोजन केले. नक्षत्रवाडीहून एन-५ पर्यंत येणाऱ्या एक्स्प्रेस लाईनवर ठिकठिकाणी मोठे कनेक्शन देण्यात आले आहेत. शिवाजीनगर, पुंडलिकनगर, एसएफएस जलकुंभावरील अनेक वॉर्डांना तीन दिवसाआड पाणी देण्यात येत होते. तीन दिवसाआड पाणी मिळणाऱ्या वॉर्डांना आता चार दिवसाआड म्हणजेच पाचव्या दिवशी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारी मध्यरात्रीपासून करण्यात आली. त्यामुळे सिडको-हडकोतील तिन्ही जलकुंभ तुडुंब भरले. आता सिडको-हडकोला चार दिवसाआड म्हणजेच पाचव्या दिवशी पाणी देण्याचे काम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
टँकरच्या फक्त ७० फेऱ्या घटल्या 
शहर परिसरातील बोअर आटल्यामुळे टँंकरची मागणी वाढत होती. मात्र, गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे काही बोअरला पाणी आले असून, टँकरची मागणी घटत आहे. रोजच्या ७० फेऱ्या रद्द झाल्या आहेत. ५१ टँकरद्वारे ५५० फेऱ्या आजही सुरू आहेत.

जायकवाडी धरणात काम सुरूच
जायकवाडी धरणात पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. मृतसाठ्यातून पाण्याचा उपसा करताना बराच त्रास सहन करावा लागत आहे. मनपाने सोमवारपासून आपत्कालीन अ‍ॅप्रोच चॅनलच्या ठिकाणी खोदकाम सुरू केले. डाव्या कालव्यापर्यंत जास्तीत जास्त पाणी आणण्यासाठी मनपाचे प्रयत्न सुरू आहेत. हे काम तीन दिवसांत पूर्ण केले जाणार आहे. सध्या एक पोकलेन, एक जेसीबी व दोन ट्रकच्या मदतीने काम सुरू आहे.
 

Web Title: CIDCO to get water on fifth day ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.