सिडको वाळूज महानगरात खंडित वीजपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:04 AM2021-06-03T04:04:02+5:302021-06-03T04:04:02+5:30

:नागरिक व ग्राहक त्रस्त; कृती समिती आंदोलनाच्या पावित्र्यात नागरिक व ग्राहक त्रस्त; कृती समिती आंदोलनाच्या पावित्र्यात वाळूज महानगर : ...

CIDCO interrupts power supply in Waluj metropolis | सिडको वाळूज महानगरात खंडित वीजपुरवठा

सिडको वाळूज महानगरात खंडित वीजपुरवठा

googlenewsNext

:नागरिक व ग्राहक त्रस्त; कृती समिती आंदोलनाच्या पावित्र्यात

नागरिक व ग्राहक त्रस्त; कृती समिती आंदोलनाच्या पावित्र्यात

वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरात खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिक व ग्राहक त्रस्त झाले आहे. महावितरणकडे सतत तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने सिडको वाळूज महानगर कृती समितीचे पदाधिकारी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

सिडको उपकेंद्रांतर्गत या परिसरातील सिडको वाळूज महानगर, साऊथसिटी, वडगाव आदींसह अनेक नागरी वसाहतीत वीजपुरवठा करण्यात येतो. मात्र काही दिवसांपासून या परिसरातील वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने नागरिक व ग्राहकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या भागात दोन दिवसांपासून पाऊस पडत असल्याने महानगरातील अनेक भागात जवळपास १२ ते १५ तास वीजपुरवठा खंडित होत आहे. विशेष म्हणजे महावितरणने पंधरवड्यापूर्वीच मान्सूनपूर्व दुरुस्तीची कामे ोकेली. मात्र पहिल्या पावसात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित होऊन महावितरणचे पितळ उघडे पडले.

सिडको वाळूज महानगरात सुरळीत वीजपुरवठा व्हावा, यासाठी कृती समितीच्यावतीने धोकादायक विद्युत खांब काढून व लोंबकळणाऱ्या तारांचा बंदोबस्त करावा, धोकादायक फ्युज बॉक्सची दुरुस्ती, डिपीजवळ संरक्षक कुंपण व जाळ्या बसविणे, ओव्हरलोड विद्युत डिपीवरील भार कमी करणे, आवश्यक ठिकाणी भूमिगत केबल टाकणे, ग्राहकांच्या तुलनेत कर्मचाऱ्यांची संख्या वाढविणे, नवीन सब स्टेशनची उभारणी करणे आदी संदर्भात अधीक्षक अभियंता व महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे मागण्या व तक्रारी केल्या आहेत. मात्र या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने आंदोलन छेडण्याचा पवित्रा कृती समितीचे अध्यक्ष नागेश कुठारे, नरेंद्रसिंग यादव, मच्छींद्र कुंभार, चंद्रकांत चोरडिया, सुदाम जाधव तसेच साऊथ सिटीतील नारायण हातोळे आदींनी घेतला आहे.

----------------------

Web Title: CIDCO interrupts power supply in Waluj metropolis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.