सिडको अधिकाऱ्याला नागरिकांचा घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 10:44 PM2019-05-03T22:44:29+5:302019-05-03T22:44:41+5:30

आठ-आठ दिवस पाणी मिळत नसल्याने सिडको साईनगरातील नागरिकांचा पाण्यासाठी टाहो सुरु आहे. आठवडाभरापासून नळाला पाणी न आल्याने संतप्त झालेल्या साईनगर ए सेक्टरमधील नागरिकांनी शुक्रवारी सिडकोचे उपअभियंता दीपक हिवाळे यांना घेराव घातला.

CIDCO officials scattering citizens | सिडको अधिकाऱ्याला नागरिकांचा घेराव

सिडको अधिकाऱ्याला नागरिकांचा घेराव

googlenewsNext

वाळूज महानगर : आठ-आठ दिवस पाणी मिळत नसल्याने सिडको साईनगरातील नागरिकांचा पाण्यासाठी टाहो सुरु आहे. आठवडाभरापासून नळाला पाणी न आल्याने संतप्त झालेल्या साईनगर ए सेक्टरमधील नागरिकांनी शुक्रवारी सिडकोचे उपअभियंता दीपक हिवाळे यांना घेराव घातला. यावेळी हिवाळे यांनी नागरिकांची समजूत घालत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिक शांत झाले.


सिडको वाळूज महानगरातील एलआयजीच्या ए सेक्टरमध्ये तर पाण्याची बोंब सुरु आहे. दहा ते बारा दिवसांतून एकदा तेही कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पाईपलाईन चूकीच्या पद्धतीने टाकली असल्यामुळे काही नागरिकांच्या नळाला तर पाणीच येत नाही. पैसे देवूनही टँकर मिळत नाही. शिवाय दुसरा पर्यायही उपलब्ध नाही. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत. शुक्रवारी पाणी येण्याचा दिवस असल्याने नागरिक सकाळपासूनच प्रतीक्षेत होते. दुपारी १ वाजता साईनगरातील बी सेक्टरमध्ये केवळ १५ ते २० मिनिटे पाणी आले. तर ए सेक्टरमध्ये पाणीच आले नाही. बराचवेळा पाण्याची प्रतिक्षा करुनही पाणी येत नसल्याने संतप्त नागरिकांनी एकत्र येवून सिडको कर्मचाºयाला बोलावून घेतले. व पाणी का येत नाही याचा जाब विचारला.

कर्मचाºयाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने नागरिकांनी थेट उपभियंता दीपक हिवाळे यांना बोलावून घेत घेराव घातला. यावेळी विनोद मोरे, संतोष पाटील, शुभम राजपूत, अभय कुलकर्णी, विजय जगताप, मंदा मोरे, उषा राजपूत, कविता तुपसमुद्रे, सुनंदा महाजन गोदावरी शिंदे, सविता जहा,सुरेखा जाधव, सीमा आगळे, वंदना वाकळे, अलका पाटील, शारदा सिरसाठ, वैशाली गवई, अलका पवार, सुनंदा पवार आदींनी हिवाळे यांना घेराव घालून पाणी देण्याची मागणी केली.


एमआयडीसीकडून कमी पाणी येत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करताना अडचणी येत आहेत. एमआयडीसीची पाईपलाईन फुटल्याने गुरुवारी रात्री पाणी आले नाही. लवकरच पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन हिवाळे यांनी दिले.

Web Title: CIDCO officials scattering citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.