उघड्यावरील सांडपाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 07:13 PM2018-10-23T19:13:51+5:302018-10-23T19:14:03+5:30

वाळूज महानगर : सिडको अंतर्गत येणाऱ्या नागरी वसाहतीचे ड्रेनेजचे पाणी उघड्यावर सोडले जात आहे. सिडकोच्या या घाण पाण्याचा त्रास मात्र वडगावकरांना सहन करावा लागत आहे. घाण पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी व डासाचा प्रार्दुभाव वाढला आहे. साथ रोगाच्या आजाराची लागण होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

CIDCO sewage pits | उघड्यावरील सांडपाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

उघड्यावरील सांडपाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

googlenewsNext

वाळूज महानगर : सिडको अंतर्गत येणाऱ्या नागरी वसाहतीचे ड्रेनेजचे पाणी उघड्यावर सोडले जात आहे. सिडकोच्या या घाण पाण्याचा त्रास मात्र वडगावकरांना सहन करावा लागत आहे. घाण पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी व डासाचा प्रार्दुभाव वाढला आहे. साथ रोगाच्या आजाराची लागण होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.


वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायत परिसरात सिडकोंतर्गत दिशा कुंज रेसिडेन्सी, सहारा भूमी, द्वारकानगरी आदी नागरी वसाहती आहेत. या वसाहतीला सुविधा देण्याची जबाबदारी सिडको प्रशासनाची आहे. मात्र, या वसाहतीचा ड्रेनेजलाईनचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.

प्रशासनाने तात्पुरती सोय म्हणून अर्धवट ड्रेनेजलाईन टाकून वडगावातील फुलेनगरालगत असलेल्या मोकळ्या भुखंडावर खड्डा करुन त्यात ड्रेनेजचे पाणी सोडले आहे. येथील एका धार्मिक स्थळाजवळील चेंबरही ओव्हर फ्लो झाले आहे.

घाण पाणी उघड्यावर साचत असल्याने परिसरात दुर्गंधी व डासाचा मोठ्या प्रमाणात प्रार्दुभाव वाढला आहे. बाजूलाच फुलेनगर व छत्रपतनीनगर या नागरी वसाहती आहेत. दुर्गंधी व डासामुळे डेंग्यु, चिकनगुणिया, मलेरिया, हिवताप, आदी साथीच्या आजाराची लागण होत आहे. लहान मुले तर सारखी आजारी पडत आहेत. उग्र वासामुळे नागरिकांना नाक दाबून ये-जा करावी लागत असून, मळमळ, उलटी, डोकेदुखी आदींचा त्रास सहन करावा लागत आहे.

दुर्गंधी व डासामुळे नागरिकांना घराबाहरे बसणे देखील अवघड झाले आहे. या विषयी स्थानिक ग्रामपंचायत व सिडको प्रशासनाला सांगितले आहे. पण कोणीच लक्ष देत नसल्याने नरक यातना सहन कराव्या लागत आसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. मंगळवारी (दि.२३) ग्रामपंचायतीच्या अधिकारी व पदाधिकाºयांनी जाऊन पाहणी करुन सिडको प्रशासनाला लवकर ड्रेनेजलाईनचा प्रश्न निकाली काढण्याचे सांगितले.

धोकादायक खड्डा 
ड्रेनेज व सांडपाणी सोडण्यासाठी चारी खोदून फुलेनगर समोरील मोकळ्या भुखंडावर मोठा खड्डा खोदला गेला आहे. या खडड््यात कायम ड्रेनेजचे पाणी असते. खडड््याच्या बाजूलाच पायवाट असून, येथून लहान शाळकरी मुले व नागरिक ये-जा करतात. रस्त्याच्या कडेलाच खड्डा असल्याने खडड््यात पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. लहान शाळकरी मुलांसाठी हा खड्डा अधिकच धोकादायक ठरत असून एखादी अप्रिय घटना घडण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

Web Title: CIDCO sewage pits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.