सिडको वाळूज महानगरातील प्रलंबित प्रश्नांवरुन खडाजंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:04 AM2021-06-05T04:04:11+5:302021-06-05T04:04:11+5:30
:प्रशासक व नागरिकात वादळी चर्चा सिडको वाळूज महानगरातील प्रलंबित प्रश्नांवरुन खडाजंगी :प्रशासक व नागरिकांत वादळी चर्चा वाळूज महानगर : ...
:प्रशासक व नागरिकात वादळी चर्चा
सिडको वाळूज महानगरातील प्रलंबित प्रश्नांवरुन खडाजंगी
:प्रशासक व नागरिकांत वादळी चर्चा
वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी शुक्रवारी सिडको कार्यालयात आयोजित बैठकीत प्रशासक व नागरिकांत चांगलीच खडाजंगी झाली.
या परिसरातील विकास कामे, सुरळीत पाणी पुरवठा, बिल्डर व इतरांची अतिक्रमणे, नागरी सुविधा आदी प्रश्नासंदर्भात चर्चा करण्यासाठी दुपारी १२ वाजेच्या सुमारास सिडको कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला सिडकोचे प्रशासक भुजंग गायकवाड, सहायक वसाहत अधिकारी गजानन साटोटे, कार्यकारी अभियंता दीपक हिवाळे, उपअभियंता कपिल राजपूत आदींची उपस्थिती होती. या बैठकीत तीसगावचे उपसरपंच नागेश कुठारे, सिडको वाळूज महानगर बचाव कृती समितीचे शीतल गंगवाल, चंद्रकांत चोरडिया, पंडित शिंदे, गणेश गोळे, पवन खैरे, दिनानाथ राठोड, प्रवीण पाटील, बाळासाहेब गाडे आदींनी आक्रमक पवित्रा घेत प्रलंबित प्रश्नासंदर्भात प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करुन दखल घेतली जात नसल्याचा आरोप केला. दोन वर्षांपासून पाठपुरावा करुनही सिडको प्रशासन समस्या निकाली काढण्याऐवजी केवळ वेळकाढू धोरण अवलंबत असल्याचा आरोपही संतप्त नागरिकांनी केला.
चौकट...
प्रश्न निकाली काढण्यासाठी नियोजन
नागरिकांच्या तक्रारी प्राधान्यक्रमाने सोडविण्यात याव्यात अशी सूचना गायकवाड यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना दिली. प्रलंबित प्रश्नांसंदर्भात पंधरा दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासक गायकवाड यांनी अधिकाऱ्यांना बजावल्याचे सहायक वसाहत अधिकारी गजानन साटोटे यांनी सांगितले.
फोटो ओळ- सिडको वाळूज महानगर कार्यालयात सिडको प्रशासक भुजंग गायकवाड व नागरिकांत सुरु असलेली चर्चा.