सिडकोत खुल्या जागेचा वापर बांधकाम साहित्य व पार्किंगसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 10:24 PM2019-03-29T22:24:37+5:302019-03-29T22:24:58+5:30
या जागेचा वापर बांधकाम साहित्यासह वाहन पार्किंगसाठी केला जात आहे. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
वाळूज महानगर : सिडको नागरी वसाहतील लहान मुलांना खेळण्यासाठी तसेच सार्वजनिक कार्यक्रमासाठी प्रशासनाने खुली जागा ठेवली आहे. मात्र, या जागेचा वापर बांधकाम साहित्यासह वाहन पार्किंगसाठी केला जात आहे. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
सिडकोवाळूज महानगर १ मधील एलआयजी व एमआयजी भागात सार्वजनिक वापरसाठी खुली जागा ठेवली आहे. लहान मुलांना खेळता यावे. तसेच वसाहतीतील सार्वजनिक कार्यासाठी जागेचा वापर करता येईल. हा यामागचा प्रशासनाचा हेतू होता. विशेष म्हणजे मोकळ्या जागेला चोहो बाजूने संरक्षण भिंती बांधून गतवर्षी येथे वृक्षारोपण केले गेले होते.
मात्र, रहिवाशांकडून या जागेचा दुुरुपयोग केला जात आहे. या जागेचा वापर बांधकाम साहित्य व वाहनाच्या पार्किंगसाठी केला जात असल्याने लहान मुलांना खेळण्यासाठी जागाच शिल्लक नाही. त्यामुळे बच्चे कंपनीचा हिरमोड होत आहे. प्रशासनाने खुल्या जागेवर बांधकाम साहित्य टाकण्यास व वाहने उभी करण्यास पायबंद घालावा, अशी मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.