किरकोळ कारणावरून सिनगीखांब्यात खून
By Admin | Published: June 21, 2017 11:29 PM2017-06-21T23:29:07+5:302017-06-21T23:32:13+5:30
सेनगाव : तालुक्यातील सिनगीखांबा येथे २० जूनच्या रात्री ९ वाजेच्या सुमारास किरकोळ भांडणाच्या वादातून एकाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : तालुक्यातील सिनगीखांबा येथे २० जूनच्या रात्री ९ वाजेच्या सुमारास किरकोळ भांडणाच्या वादातून एकाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना घडली. यात बुधवारी सकाळी सेनगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून दोन आरोपींना अटक केली आहे.
सिनगीखांबा येथे मंगळवारी रात्री ९ वाजेदरम्यान गावातील शेषराव रामराव पोले, बाबाराव रामराव पोले यांनी कानबाराव बाजीराव पोले याच्या घरी येवून आमचे भाचा जावाई श्रीराम बर्वे यांचे डोके का फोडले? या कारणावरून वाद घातला. त्यात रागाच्या भरात कानबाराव पोले यांच्या पोटात चाकूचे वार करून काठीने जबर मारहाण केली. या घटनेत कानबाराव यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना सेनगाव ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. शिवकांता बाजीराव पोले यांच्या फिर्यादीवरून आरोपी शेषराव रामराव पोले, बाबाराव रामराव पोले यांच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तर दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. घटनास्थळास पोलीस उपअधीक्षक सिद्धेश्वर भोरे यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मधुकर कारेगावकर करीत आहेत.