टेस्टिंगसाठी नागरिक येईना, लसीकरणासाठी शासन व्हायल देईना (नियोजनाचा विषय)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:02 AM2021-05-12T04:02:27+5:302021-05-12T04:02:27+5:30

रऊफ शेख फुलंब्री : तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संक्रमित नागरिकांचा आकडा हजारावर गेला. आता यात टेस्टिंग करण्यासाठी स्वत:हून नागरिक ...

Citizens did not come for testing, government did not come for vaccination (planning subject) | टेस्टिंगसाठी नागरिक येईना, लसीकरणासाठी शासन व्हायल देईना (नियोजनाचा विषय)

टेस्टिंगसाठी नागरिक येईना, लसीकरणासाठी शासन व्हायल देईना (नियोजनाचा विषय)

googlenewsNext

रऊफ शेख

फुलंब्री : तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संक्रमित नागरिकांचा आकडा हजारावर गेला. आता यात टेस्टिंग करण्यासाठी स्वत:हून नागरिक समोर येत नसल्याचे दिसून येत आहे, तर लसीकरण करण्यासाठी शासनाकडून ‘व्हायल’चा पुरवठा सुरळीत होईना, अशी भयावह परिस्थिती निर्माण झाल्याने संभाव्य तिसऱ्या लाटेला आरोग्य विभाग कसे रोखू शकणार, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

फुलंब्री तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च २०२० पासून लॉकडाऊनला सुरुवात झाली. १ मार्च २०२० ते ३१ जानेवारी २०२१ या पहिल्या लाटेत ५४७ कोरोनाबाधित आढळून आले, तर दुसरी लाट अत्यंत वेगाने आली. यात १ फेब्रुवारी २०२१ ते ३० एप्रिल या तीन महिन्यांच्या काळातच ९०५, तर १० मेपर्यंत १,०२२ कोरोनाबाधित रुग्ण निघाले. आता संभाव्य असलेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी प्रशासन सज्ज असले तरी त्यांना नागरिकांकडून सहकार्य मिळेल की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यात शासनाकडून प्रत्येक ठिकाणी कोरोना लसीकरणासाठी आवश्यक लसींचा साठा उपलब्ध होत नसल्याने लसीकरण मोहिमेलाच हरताळ फासला गेला आहे.

फुलंब्री तालुक्यातील परिस्थिती

कोरोनाबाधित एकूण रुग्णसंख्या : १,५६९

सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण : १५९

विलगीकरणामधील रुग्ण : ९६

फुलंब्री शहरातील रुग्णसंख्या : १५

ग्रामीण भागातील रुग्णसंख्या : १४४

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण : १४.७

----------

आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण

पहिला डोस : ८८८

दुसरा डोस : ४०९

फ्रंटलाइन वर्कर

पहिला डोस : १,२५७

दुसरा डोस : ४५३

४५ ते ५९ वयोगटातील लसीकरण

पहिला डोस : ४,९५४

दुसरा डोस : १६९

६० वयावरील नागरिकांना :

पहिला डोस : ५,३१८

दुसरा डोस : १५९

१८ ते ४४ वयोगट : १७३

-------

कोरोना टेस्टिंग : पॉझिटिव्ह संख्या

१ एप्रिलपर्यंत : १०,१७८

१ ते १० एप्रिल : १,९१५

१० ते २० एप्रिल : २,०१८

२० ते ३० एप्रिल : २,६४८

३० एप्रिल ते ८ मे : २,२४२

---

पॉइंट

:

१) लोकसंख्येच्या मानाने टेस्टिंगचे प्रमाण नगण्य : फुलंब्री तालुक्याची लोकसंख्या १ लाख ६१ हजार आहे. या संख्येच्या तुलनेत आतापर्यंत १९ हजार लोकांची टेस्टिंग करण्यात आली आहे. आरोग्य विभाग असो अथवा स्थानिक ग्रामपंचायतीच्या वतीने टेस्टिंग, लसीकरणासाठी जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे; पण यासाठी नागरिकांकडून सहकार्य मिळताना दिसत नाही. टेस्टिंग म्हटले की नागरिक पुढे यायला तयार होत नाहीत.

२) गैरसमज दूर झाला, पण लस मिळेना : तालुक्यातील नागरिक सुरुवातीला लसीकरण करण्याला धजावत नव्हते; पण आता लसीकरणाबाबत गैरसमज दूर झाल्याने लस घेण्यासाठी केंद्रांवर गर्दी करू लागले आहेत. आतापर्यंत १३,५९७ जणांचे लसीकरण झाले आहे; मात्र आता काही दिवसांपासून लसी उपलब्ध नसल्याने लसीकरणाच्या प्रक्रियेला ब्रेक लागला आहे. लस मिळेल का लस, अशी म्हणण्याची नागरिकांवर वेळ आली आहे.

३) कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण १४ टक्क्यांवर : फुलंब्री तालुक्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण १४.७ टक्क्यांवर आले आहे. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील १४ लोकांची तपासणी केली जाते. एखाद्या गावात पॉझिटिव्हची संख्या वाढल्याचे आढळून आले तर अशा ठिकाणी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर जास्त जोर दिला जातो.

कोट :

फुलंब्री तालुक्यात लॉकडाऊन काळातील कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत बरीच घट आली. नागरिक टेस्टिंगसाठी पुढाकार घेण्यास तयार नाही, तर लसीकरण करण्याकडे नागरिकांचा कल वाढलेला आहे; पण सध्या लसी कमी प्रमाणात उपलब्ध होत आहेत. टेस्टिंग व लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी आरोग्य विभागाचे काम सुरू आहे.

- डॉ. प्रसन्ना भाले, तालुका आरोग्य अधिकारी

Web Title: Citizens did not come for testing, government did not come for vaccination (planning subject)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.