औरंगाबादकरांच्या सेवेत आजपासून महानगरपालिकेची शहर बस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:11 PM2019-01-23T12:11:24+5:302019-01-23T12:15:22+5:30

मागील अनेक वर्षांपासून औरंगाबादकर दर्जेदार शहर बसची वाट पाहत होते.

City corporation bus in service of Aurangabadkar from today | औरंगाबादकरांच्या सेवेत आजपासून महानगरपालिकेची शहर बस 

औरंगाबादकरांच्या सेवेत आजपासून महानगरपालिकेची शहर बस 

googlenewsNext
ठळक मुद्दे रात्री १० वाजेपर्यंत या बसेस धावतील. दोन किलोमीटरच्या प्रवासासाठी फक्त ५ रुपये आकारण्यात येतील.

औरंगाबाद : मागील अनेक वर्षांपासून औरंगाबादकर दर्जेदार शहर बसची वाट पाहत होते. आज सकाळी ५.३० वाजेपासून २५ शहर सुरु झाल्या. सकाळी ९ वाजता पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद , महापौर नंदकुमार घोडेले , उपमहापौर विजय औताडे , मनपा आयुक्त निपुण विनायक यांनी १० रुपयांचे तिकीट घेऊन औरंगपुरा ते रेल्वे स्टेशन असा प्रवास स्मार्ट बस मध्ये केला .

शहर बसच्या अभावामुळे नागरिकांना शहरांतर्गत प्रवास करतांना प्रचंड त्रास सहन  करावा लागत असे. शहराच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकाकडे जायचे असल्यास अ‍ॅपे, रिक्षाचालक प्रवास्यांना वेठीस धरत मनमानी भाडे आकारून लूट करीत असत. अवाच्या सव्वा पैसे देऊन नागरिकांना प्रवास करावा लागत होता. स्मार्ट सिटी योजनेत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यावर केंद्र शासनाने भर दिला आहे. या उपक्रमांतर्गत महापालिकेने तब्बल १०० बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील २५ बस मनपाला प्राप्त झाल्या आहेत. या प्रकल्पावर महापालिकेने स्मार्ट सिटीतील किमान ३६ कोटी रुपये खर्च केले आहेत.



 

अत्यंत कमी भाडे असणार 
शहर बसमधील दोन किलोमीटरच्या प्रवासासाठी फक्त ५ रुपये आकारण्यात येतील. शहराच्या आसपासच्या छोट्या-छोट्या गावांपर्यंत स्मार्ट बस जाईल, असे नियोजन करण्यात आले आहे. पहाटे पाच वाजेपासून ही सेवा एस. टी. महामंडळ देणार आहे. रात्री १० वाजेपर्यंत या बसेस धावतील. सर्व प्रमुख रस्त्यांवर पाच ते दहा मिनिटांमध्ये नागरिकांना शहर बस उपलब्ध होईल, यादृष्टीने एस. टी. महामंडळाने सूक्ष्म नियोजन केले आहे. शहराबरोबरच वाळूज, रांजणगाव, बजाजनगर, हर्सूल-सावंगी, चिकलठाणा, नक्षत्रवाडी, सातारा-देवळाई, हिंदुस्थान आवासपर्यंत बसेस धावणार आहेत.

काही जागा आरक्षित
स्मार्ट बसेसमध्ये स्वातंत्र्यसैनिक, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत.  एस. टी. महामंडळाप्रमाणे सर्व सवलती देण्यात आल्या आहेत. स्मार्ट बस ३२ आसनी असून, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा, पॅनिक बटन, अग्निशमन यंत्रणा बसविलेली आहे.

Web Title: City corporation bus in service of Aurangabadkar from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.