शहर हगणदारीमुक्तीचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 11:59 PM2017-08-31T23:59:03+5:302017-08-31T23:59:03+5:30
हानगरपालिकेच्या गुरुवारी झालेल्या विशेष सभेत परभणी शहर हगणदारीमुक्त झाल्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महानगरपालिकेच्या गुरुवारी झालेल्या विशेष सभेत परभणी शहर हगणदारीमुक्त झाल्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
३१ आॅगस्टपर्यंत शहर हगणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट दिले होते. त्या अनुषंगाने गुरुवारी येथील बी.रघुनाथ सभागृहात महापौर मीनाताई वरपूडकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलावण्यात आली. यावेळी उपमहापौर माजू लाला, आयुक्त राहुल रेखावार, नगरसचिव कुलकर्णी यांची उपस्थिती होती. या सभेत शहर हगणदारीमुक्त झाल्याचा ठराव घेण्यात आला. त्यास मंजुरी मिळाली. विशेष म्हणजे, अनेक नगरसेवक या सभेला अनुपस्थित होते.
स्वच्छ महाराष्टÑ अभियानांतर्गत परभणी शहरात मागील सात-आठ महिन्यांपासून स्वच्छता अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालयाचे अनुदान वाटप करणे, सार्वजनिक शौचालयाची स्थळे निष्कासित करणे, सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम करणे आदी कामे करण्यात आली. शहरातील सार्वजनिक शौचालयाची ४७ स्थळे निष्कासित करण्यात आली असून, ४७ ठिकाणी सार्वजनिक शौचालये बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या आधारावर शहर हगणदारीमुक्त झाल्याचा ठराव घेण्यात आला.