कचऱ्यामुळे शहर बकाल झाले आहे ; राज ठाकरेंची नाव न घेता सेना-भाजपवर टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 12:31 PM2018-07-19T12:31:09+5:302018-07-19T12:35:13+5:30
कचऱ्यामुळे शहर बकाल होत आहे, आम्ही नाशिकमध्ये पाच वर्षात कचऱ्याचा प्रश्न सोडवला आहे,यांना २५ वर्षात हे जमल नाही. एकदा तिथे जाऊन काम बघा असा टोला लगावत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सेना-भाजपच्या कारभारावर नाव न घेता टीका केली.
औरंगाबाद : कचऱ्यामुळे शहर बकाल होत आहे, आम्ही नाशिकमध्ये पाच वर्षात कचऱ्याचा प्रश्न सोडवला आहे,यांना २५ वर्षात हे जमल नाही. एकदा तिथे जाऊन काम बघा असा टोला लगावत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सेना-भाजपच्या कारभारावर नाव न घेता टीका केली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर असून त्यांनी आज सुभेदारी विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले शहरातील कचरा प्रश्न गंभीर होत असून यामुळे शहर बकाल होत आहे. आमच्या हातात सत्ता असल्याने नाशिकमध्ये पाच वर्षात कचरा प्रश्न सोडवला.येथे २५ वर्षात परिस्थिती तशीच आहे. कचरा वर्गीकरण, त्याचे व्यवस्थापन पहायचे असेल तर नाशिकला या असा टोला त्यांनी सेना-भाजपचे नाव न घेता लगावला.
मनसेही सत्तेत येणार
शिवसेनेला पूर्वी मवाल्यांची शिवसेना म्हणून ओळखली जायची पण त्यानंतर ती सत्तेत आली. मनसेची ओळख आता अशी असेल तर आम्ही लवकरच सत्तेत येऊ अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी युवेली एका प्रश्नावर दिली
भाजप ईव्हीएम मुळे सत्तेत
भाजपच्या निवडणुकीतील विजयावर बोलताना राज ठाकरे भाजप ईव्हीएममुळे जिंकत असल्याचे आरोप करत, ईव्हीएम मशीन मधे घोळ आहे, एखाद्या उमेदवारांना शून्य मते कशी काय पडू शकतात असा प्रश्न उपस्थित केला.
सेना-भाजप सत्ता येणार नाही
२०१९ च्या विधानसभा निवडणुकांवर बोलताना राज ठाकरे म्हणाले कि, यापुढे सेना-भाजपची सत्ता येणार नाही हे नक्की आहे. आम्ही यासाठी वेगळी रणनिती आखणार आहोत.