शहरी रुग्णालयांचीही भरती रखडलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 12:23 AM2017-11-02T00:23:13+5:302017-11-02T00:23:31+5:30

ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी रुग्णालयेही रिक्त पदांमुळे अडचणीत आलेली आहेत. मात्र ती कमतरता दूर करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने एनआरएचएममधून काही पदे भरण्यासाठी प्रक्रिया हाती घेतली होती. मात्र ती अद्याप पूर्ण झाली नाही. त्यामुळे शहरी रुग्णालयांचेही तेच हाल आहेत.

City hospital recruitment | शहरी रुग्णालयांचीही भरती रखडलेलीच

शहरी रुग्णालयांचीही भरती रखडलेलीच

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी रुग्णालयेही रिक्त पदांमुळे अडचणीत आलेली आहेत. मात्र ती कमतरता दूर करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने एनआरएचएममधून काही पदे भरण्यासाठी प्रक्रिया हाती घेतली होती. मात्र ती अद्याप पूर्ण झाली नाही. त्यामुळे शहरी रुग्णालयांचेही तेच हाल आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालयच वैद्यकीय अधिकाºयांची अनेक पदे रिक्त असल्याने सलाईनवर आहे. त्यातच स्त्रीरोग तज्ज्ञ नसल्याने अनेकदा बाहेरून डॉक्टर बोलावण्याची वेळ येते सिझेरियनसाठी तर नेमका याशिवाय पर्यायच नाही. त्यातच मध्यंतरी एनआरएचएमअंतर्गत कंत्राटी तत्त्वावर भरतीसाठी शासनाने मंजुरी दिल्यानंतर जाहिरातही काढण्यात आली होती. मात्र त्याची भरती काही अद्याप झाल्याचे दिसत नाही. यात आयुष वैद्यकीय अधिकारी, युनानी वैद्यकीय अधिकारी, महिला मसाजिस्ट, आरबीएसकेसाठी एक वैद्यकीय अधिकारी व एक औषध निर्माता, बालरुग्ण अतिदक्षता विभागात ३ परिचारिका, भारतीय आरोग्य मानांकित रुग्णालय अंतर्गत जिल्हा रुग्णालयात ४ स्त्रीरोग तज्ज्ञ, कळमनुरी व सेनगावात प्रत्येकी एक स्त्री रोग तज्ज्ञ भरायचा आहे. याशिवाय जिल्हा रुग्णालयात फिजिशियन, हृदयरोग तज्ज्ञ, कान, नाक, घसा तज्ज्ञ, दंतरोग तज्ज्ञ, सर्जन-१ व रेडिआॅलॉजिस्ट-२ पदे भरायची आहेत.
ही पदे वेळेत भरली तर रुग्णांना या सुविधेचा लाभ होणार आहे. मात्र शासनाने मंजुरी दिल्यानंतरही त्यासाठीची प्रक्रिया काही गतिमान होत नाही. जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी प्रकल्प प्रेरणाकडे लक्ष दिल्याने त्यात डॉक्टरांची भरती करण्यात यश आले होते. शिवाय त्यांनी मध्यंतरी प्रयत्नपूर्वक काही जागा भरून घेतल्याने अनेक ठिकाणी आज तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध झाली आहे. या रिक्त जागा भरण्यासाठीही जिल्हा सामान्य रुग्णालयासह जिल्हाधिकाºयांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

Web Title: City hospital recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.