शहर पोलीस, एमआर संघ अंतिम फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 12:29 AM2018-01-08T00:29:45+5:302018-01-08T00:30:26+5:30

गरवारे क्रीडा संकुलावर आज झालेल्या औद्योगिक टष्ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेत शहर पोलीस ब संघाने डीबीए सिनिअर संघाचा आणि एमआर इलेव्हन संघाने एमएसईडीसीएल संघाचा पराभव करीत अंतिम फेरीत धडक मारली.

 City Police, MR team in the final round | शहर पोलीस, एमआर संघ अंतिम फेरीत

शहर पोलीस, एमआर संघ अंतिम फेरीत

googlenewsNext

औरंगाबाद : गरवारे क्रीडा संकुलावर आज झालेल्या औद्योगिक टष्ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेत शहर पोलीस ब संघाने डीबीए सिनिअर संघाचा आणि एमआर इलेव्हन संघाने एमएसईडीसीएल संघाचा पराभव करीत अंतिम फेरीत धडक मारली. फैजल पटेल आणि शेख अहमद हे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.
पहिल्या उपांत्य फेरीत एमएसईडीसीएलने २० षटकांत ९ बाद १३४ धावा केल्या. त्यांच्याकडून रोहित ठाकूर याने ४६ चेंडूंत २ षटकार व ३ चौकारांसह ४९ आणि बाळासाहेब मगर याने २२ धावा केल्या. एमआर इलेव्हनकडून ऋषिकेश नायर याने २३ धावांत ३ गडी बाद केले. अनिरुद्ध शास्त्री, सिराज काझी, विजय ढेकळे, सईद जलीस यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात एमआर संघाने विजयी लक्ष्य १९.२ षटकांत ६ फलंदाज गमावून गाठले. त्यांच्याकडून फैजल पटेल याने ४४ चेंडूंत ७ चौकार व एका षटकारासह ५१, सय्यद जलीस याने नाबाद ३५ व विजय ढेकळे याने १० चेंडूंत २ षटकार व एका चौकारांसह २० धावा केल्या. एमएसईडीसीएलकडून इनायत अली, कैलास शेळके, पवन सूर्यवंशी, बाळासाहेब मगर व निशित कंडी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
दुसºया उपांत्य फेरीत शहर पोलीस ब संघाने प्रथम फलंदाजी करीत २० षटकांत ६ बाद १७३ धावा केल्या. त्यांच्याकडून अजय कावळे याने ४० चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांसह ७०, शेख अहमद याने ३२ चेंडूंत ५ षटकार व एका चौकारांसह ५१ व अक्षय खरातने २२ धावा केल्या. डीबीए संघाकडून गोपाल पांडेने ३५ धावांत ३ गडी बाद केले. अभिलेष पवार व उदय पांडे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात डीबीए संघ १३.३ षटकांत ९९ धावांत सर्वबाद झाला. त्यांच्याकडून उदय पांडेने ३२, गौरव शिंदेने ३३ धावा केल्या. शहर पोलीस ब संघाकडून ज्ञानेश्वर वानखेरे याने २२ धावांत ४, शेख रिझवानने ९ धावांत ३ व शेख अहमद याने २१ धावांत २ गडी बाद केले

Web Title:  City Police, MR team in the final round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.