भविष्याचा विचार करून शहर विकासासाठी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:05 AM2021-01-21T04:05:36+5:302021-01-21T04:05:36+5:30

औरंगाबाद : शहरातील रस्ते, पाणी, कचरा, पथदिवे या मूलभूत सुविधांवर काम पूर्ण झाले आहे. पर्यावरण, करमणूक या क्षेत्रातील विकासाचा ...

City ready for future development | भविष्याचा विचार करून शहर विकासासाठी सज्ज

भविष्याचा विचार करून शहर विकासासाठी सज्ज

googlenewsNext

औरंगाबाद : शहरातील रस्ते, पाणी, कचरा, पथदिवे या मूलभूत सुविधांवर काम पूर्ण झाले आहे. पर्यावरण, करमणूक या क्षेत्रातील विकासाचा विचार केला पाहिजे. भविष्याचा विचार करून शहर विकासासाठी सज्ज असल्याचे मत महानगरपालिकेचे प्रशासक अस्तिक कुमार पाण्डेय यांनी व्यक्त केले.

औरंगाबाद फर्स्ट, मराठवाडा एन्व्हायर्नमेंट केअर क्लस्टर (एमईसीसी) च्या पुढाकाराने शहरातील वाहतूक व्यवस्थापनावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी बैठक घेण्यात आली. यावेळी पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपाचे शहर अभियंता सखाराम पानझडे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता दिलीप उकिरडे, एमएसईबीचे मुख्य अभियंता भुजंग खंदारे, एमआयडीसीचे क्षेत्रीय अधिकारी राजेश जोशी, नरसिंह भांडे, महावितरण अधीक्षक अभियंता बिभीषण निर्मल, औरंगाबाद फर्स्टचे अध्यक्ष प्रितीश चटर्जी, बागला ग्रुपचे संचालक ऋषी बागला, राजेश चंचलानी, विवेक भोसले, धीरज देशमुख, हेमंत लांडगे यांची उपस्थिती होती.

पाण्डेय म्हणाले की, मनपाने १०० कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पांची कामे पूर्ण केली. आता १५२ कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. एएससीडीसीएलने मास्टर सिस्टम इंटिग्रेटर (एमएसआय) प्रकल्पांतर्गत लक्ष ठेवण्यासाठी १०० किलोमीटरहून अधिक केबल टाकण्यासाठी खोदकाम करून केबल टाकल्या आहेत. यामध्ये पोलीस आयुक्त कार्यालयात नुकत्याच उद्घाटन झालेल्या कमांड अँड कंट्रोल सेंटरचा समावेश आहे. १६८० कोटींचा पाणीपुरवठा प्रकल्प अंमलबजावणीच्या मार्गावर आहे. शहरात स्ट्रीटलाईट बसविणे जवळजवळ पूर्ण झाले. मनपा आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी एकत्रितपणे ई-गव्हर्नन्सवर काम करत आहे. ज्यामुळे लवकरच प्रमाणपत्रे, ऑनलाईन देयके आणि व्यवहारांची घरपोच सेवा देणे शक्य होईल. सध्या शहरातील १० ऐतिहासिक दरवाजे व शहागंज येथील टॉवरचे काम एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मनपा शहरी भागात वृक्ष लागवड करेल. ज्या अंतर्गत ८० ठिकाणी १० हजार झाडे लावली जातील.

औरंगाबाद फर्स्टचे अध्यक्ष प्रीतेश चटर्जी यांनी जालना रोडवरील वळणासंदर्भात सादरीकरण केले. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी जालना रोडला औरंगाबादचा मॉडेल रोड बनविण्याची बांधिलकी व्यक्त केली.

Web Title: City ready for future development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.