शहरात दररोज येते ६ हजार टन वाळू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:05 AM2021-03-24T04:05:16+5:302021-03-24T04:05:16+5:30
औरंगाबाद : शहरात चोहीकडे बांधकाम सुरू आहे. दररोज शहरात ६ हजार टनपेक्षा अधिक वाळू आणली जात आहे. वाळू उपशावर ...
औरंगाबाद : शहरात चोहीकडे बांधकाम सुरू आहे. दररोज शहरात ६ हजार टनपेक्षा अधिक वाळू आणली जात आहे. वाळू उपशावर बंदी घातल्याने मागील वर्षभरात वाळूचे भाव ३५ टक्क्यांने वाढले आहे.
शिवना व गोदावरी नदी पात्रातील वाळू शहरात मोठ्या प्रमाणात येत असो पण सध्या येथील वाळू उपस्याला बंदी आहे. शहरात जालना जिल्ह्यातील नदी काठावरील काही गावातून व गुजरातमधील तापीची वाळू आणली जात आहे. तापीची वाळू दर्जेदार मानली जाते. शहरात दररोज १०० ट्रक वाळू आणली जाते. एक गाडीत ६ ब्रास म्हणजे ६ हजार ब्रास वाळू शहराला दररोज लागते. जिल्ह्यातील नदीपात्रात वाळू उपस्यावर बंदी असल्याने मागील वर्षभरात वाळूचे भाव ३५ टक्क्यांने वाढले आहे. आजघडीला तापीची वाळू ८ हजार रुपये ब्रासने मिळत आहे. जालना जिल्ह्यातून येणारी वाळू ७ हजार रुपये, पैठण येथील वाळू ६ हजार रुपये तर शिवानाची वाळू ४५०० रुपये ब्रासने मिळत आहे. नदीपात्रातील वाळू प्लास्टरसाठी वापरली जात आहे. जिल्ह्यातील नदीपात्रातून उपास्याला बंदी असतानाही वाळू आणली जात आहे. अनधिकृतरीत्या आणलेली वाळू तेवढीच महाग विकल्या जात आहे. यात सरकारचा महसूल बुडत आहे. तर दुसरीकडे ग्राहकांना वाळू महाग मिळत आहे, असे बांधकाम व्यावसायिकांनी सांगितले.
चौकट
छत्तीसगढहून रेल्वेने वाळू आणण्याची क्रेडाईची तयारी
वाळूचे भाव प्रचंड वाढले आहे. यामुळे आता परवडणारी घरे उभारणे कठीण जात आहे. तसा येथील वाळूचा दर्जा दुय्यम आहे. यासाठी थेट छत्तीसगढ राज्यातून रेल्वेने वाळू आणण्याची तयारी क्रेडाई करत आहे. रेल्वेने एकाच वेळेस ४ हजार टन वाळू आणली जाते. तेथील वाळू दर्जेदार आहे. चाळणी करावी लागत नाही तो खर्च वाचतो. साधारणतः जून महिन्याच्या आधी रेल्वेने वाळू आणण्याचे नियोजन केले जात आहे.
नितीन बगडिया
अध्यक्ष, (इलेक्ट) क्रेडाई
क्रेडाईच्या वतीने जून महिन्यात थेट छत्तीसगड येथून रेल्वेने वाळू आणण्याचे नियोजन सुरू आहे.