शहरात कर वसुली मोहीम तीव्र
By Admin | Published: March 28, 2017 12:03 AM2017-03-28T00:03:25+5:302017-03-28T00:08:08+5:30
जालना: नगर पालिकेच्या वतीने कर वसुली मोहीम तीव्र करण्यात आली आहे
जालना: नगर पालिकेच्या वतीने कर वसुली मोहीम तीव्र करण्यात आली आहे. सोबतच स्वच्छ महाराष्ट्र योजनेतंर्गत होणाऱ्या शौचालयांच्या कामांना गती आली आहे. सोमवारी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी बैठक घेऊन कामांचा आढावा घेतला.
शहरात नगर पालिकेची विविध करापोटी सुमारे १५ कोटींपेक्षा अधिक थकबाकी आहे. गत दोन महिन्यांपासून विशेष मोहिमेतून सुमारे पावणे दोन कोटींची कर वसुली झाल्याचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर व
हरिश्चंद्र आंधळे यांनी सांगितले. विशेष कॅम्पच्या माध्यमातूनही चांगली वसुली होत असल्याचे सांगण्यात आले. आगामी काळात कर वसुलीसोबतच वैयक्तिक शौचालय कामांना गती देण्यात येणार आहे.
२५ मार्च अखेर शहरात साडेचार वैयक्तिक शौचालयांची कामे पूर्ण झाली असून, तितकीच कामे प्रगतीपथावर आहेत. एप्रिल महिन्यात संपूर्ण कामे पूर्ण होतील, असा विश्वास खांडेकर यांनी व्यक्त केला. स्वच्छता विभागाच्या माध्यमातूनही सर्वदूर जनजागृती करण्यात येत आहे.