शहरात तीन महिन्यांत होमोग्राफ्ट टिश्यू बँक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 11:40 PM2019-04-03T23:40:23+5:302019-04-03T23:41:19+5:30
शहरातील युनायटेड सिग्मा हॉस्पिटलला होमोग्राफ्ट टिश्यू बँकेसाठी मान्यता मिळाली आहे. ही मान्यता मिळविणारे महाराष्ट्रातील पहिले आणि भारतातील आठवे रुग्णालय ठरले आहे. या बँकेच्या माध्यमातून ब्रेनडेड रुग्णांच्या हृदयातील होमोग्राफ्ट जतन केले जातील. त्यातून व्हॉल्व्ह बदलणे शक्य होईल. तीन महिन्यांत ही बँक कार्यान्वित होईल, असे हृदय प्रत्यारोपण व हृदय शल्यचिकित्सक डॉ. आनंद देवधर यांनी सांगितले.
औरंगाबाद : शहरातील युनायटेड सिग्मा हॉस्पिटलला होमोग्राफ्ट टिश्यू बँकेसाठी मान्यता मिळाली आहे. ही मान्यता मिळविणारे महाराष्ट्रातील पहिले आणि भारतातील आठवे रुग्णालय ठरले आहे. या बँकेच्या माध्यमातून ब्रेनडेड रुग्णांच्या हृदयातील होमोग्राफ्ट जतन केले जातील. त्यातून व्हॉल्व्ह बदलणे शक्य होईल. तीन महिन्यांत ही बँक कार्यान्वित होईल, असे हृदय प्रत्यारोपण व हृदय शल्यचिकित्सक डॉ. आनंद देवधर यांनी सांगितले.
युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये बुधवारी होमोग्राफ्ट टिश्यू बँकेविषयी पत्रकार परिषदेत माहिती देताना ते बोलत होते. यावेळी मुख्य वैद्यकीय संचालक डॉ. उन्मेष टाकळकर, सीईओ डॉ. अजय रोटे, डॉ. बालाजी आसेगावकर, डॉ. प्रमोद अपसिंगेकर, डॉ. मिलिंद खर्चे, डॉ. समीध पटेल यांची उपस्थिती होती. डॉ. देवधर म्हणाले, अवयवदानात अनेकदा हृदयाचे प्रत्यारोपण टळते. त्यामुळे हृदय वाया जाऊ नये, यासाठी प्रयत्न करण्यात आला. होमोग्राफ्ट बँकेला मंजुरी मिळाल्याने आता ब्रेनडेड रुग्णाचे होमोग्राफ्ट (हृदयाचा काही भाग) काढून जतन के ला जाईल. यातून भविष्यात वॉल्व्ह बदलण्यास मदत होईल. त्यामुळे पूर्ण हृदय निरुपयोगी होणार नाही. होमोग्राफ्ट मुख्यत्वे जटिल हृदयरोग असलेल्या मुलांमध्ये वापरले जाईल. त्यामुळे हृदरोगाच्या मुलांना यामुळे नवीन आयुष्य मिळेल. डॉ. टाकळकर म्हणाले, हृदय, लिव्हर, किडनी प्रत्यारोपणाबरोबर आता गरजू रुग्णांसाठी होमोग्राफ्ट जतन आणि प्रत्यारोपण करता येईल.
कृत्रिम फुफ्फुसाद्वारे रक्तसंक्रमण
श्वसनाच्या गंभीर आजाराने मृत्यूशी झुंज देणाऱ्या एका १२ वर्षीय मुलीचे प्राण वाचविण्यात यश मिळाले. ‘ईसीएमओ’ उपक रणाच्या माध्यमातून हे यश मिळाले. यात रुग्णाच्या रक्तप्रवाहात कृत्रिम फुफ्फुसाद्वारे रक्तसंक्रमण प्रसारित करण्यात आल्याचे डॉ. समीध पटेल यांनी सांगितले.