शहराचा पॉझिटिव्हिटी रेट १.५७
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:04 AM2021-06-05T04:04:01+5:302021-06-05T04:04:01+5:30
शासकीय, खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या घटली औरंगाबाद : शहरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये अडीच महिन्यांपूर्वी कोणतेही बेड उपलब्ध होत नव्हते. ...
शासकीय, खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या घटली
औरंगाबाद : शहरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये अडीच महिन्यांपूर्वी कोणतेही बेड उपलब्ध होत नव्हते. आता रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत असल्यामुळे शहरातील सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांमधील सक्रिय रुग्णांची संख्या पाचशेच्या आत आली आहे. ही संख्या १२ हजारांपर्यंत गेली होती.
निर्बंध शासनाने कमी केले, कोरोनाने नव्हे
औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने निर्बंध काही प्रमाणात कमी केल्याने नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना किंचित दिलासा मिळाला आहे. सोमवार ते शुक्रवारपर्यंत बाजारपेठ दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहत आहे. यानंतरही सर्वसामान्य नागरिक बिनधास्तपणे फिरत आहेत. कारण नसताना फिरणाऱ्या तीनशे नागरिकांची शुक्रवारी तपासणी करण्यात आली. निर्बंध शासनाने कमी केले आहेत, कोरोनाने नव्हे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले.
१५०३ प्रवासी शहरात दाखल, ३ बाधित
औरंगाबाद : शहरात दाखल होणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची कोरोना टेस्ट करण्यात येत आहे. शुक्रवारी सहा ठिकाणी केलेल्या तपासणीत तीन जण बाधित आढळून आले. रेल्वे स्टेशनवर १८३ प्रवाशांची तपासणी केली. विमानतळावर गुरुवारी ज्या प्रवाशांची तपासणी केली होती त्यातील एक जण आज बाधित आढळून आला.