महसूलला डावलल्याने नागरी सेवा पुरस्कार वादात

By Admin | Published: April 23, 2016 01:10 AM2016-04-23T01:10:39+5:302016-04-23T01:21:39+5:30

औरंगाबाद : १० व्या नागरी सेवा दिनानिमित्त देण्यात आलेल्या पुरस्कारात महसूल विभागाला डावलल्यामुळे ते पुरस्कार वादात अडकले आहेत.

Civil Service Award for Due to Releasing Revenue | महसूलला डावलल्याने नागरी सेवा पुरस्कार वादात

महसूलला डावलल्याने नागरी सेवा पुरस्कार वादात

googlenewsNext

औरंगाबाद : १० व्या नागरी सेवा दिनानिमित्त देण्यात आलेल्या पुरस्कारात महसूल विभागाला डावलल्यामुळे ते पुरस्कार वादात अडकले आहेत. पुरस्काराची यादी पाहिली असता यामध्ये क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांना डावलण्यात आले आहे, अशी तक्रार राज्य तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा समजला जातो. ज्यावेळी शासनाचे अतिमहत्त्वाचे विषय मार्गी लावणे अथवा कार्यान्वित करायचे असतात. तेव्हा महसूल विभागावरच ती जबाबदारी दिली जाते. कितीही कामाचा व्याप असला तरी तो विभागच कामे पूर्ण करतो. असे असताना पुरस्कार देताना किंवा वेतनश्रेणी देण्याचा विषय आला की महसूल विभागाचा शासनाला सोयिस्कररीत्या विसर पडतो. महसूल विभागात केवळ जिल्हाधिकारीच काम करतात व इतर पदांवरील अधिकारी, कर्मचारी जसे अप्पर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, तलाठी, कनिष्ठ लिपिक, शिपाई, वाहनचालक, कोतवाल हे कोणीच काम करीत नाहीत, असा शासनाचा समज झाला आहे. दुष्काळात हीच यंत्रणा काम करीत आहे. शासनाला याचा विसर पडल्याचा आरोप संघटनेने केला आहे. महसूल विभागच खऱ्या अर्थाने नागरी सेवा विभाग आहे; परंतु नागरी सेवा दिनाच्या सत्कारातून या विभागालाच डावलल्याने संघटनेच्या भावना तीव्र झाल्या आहेत, असे संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश बगळे यांनी पत्रात म्हटले आहे.
जिल्हाधिकारी डॉ.निधी पांडे यांनी १० व्या नागरी सेवा दिनानिमित्त अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, तहसीलदार शशिकांत गायकवाड, नायब तहसीलदार बी. डी. म्हस्के, मंडळ अधिकारी सतीश तुपे, अव्वल कारकून सचिन सपकाळे, तलाठी उदय कुलकर्णी, लिपिक आर. के. जरे, लघुलेखक डी. एल. आटुळे, लघुटंकलेखक दीपक आगळे, वाहनचालक गोरख डोंगरे, शिपाई फकीरचंद डोंगरे, कोतवाल राजेंद्र सुरासे यांना नागरी सेवा पुरस्कार प्रदान केला.
नागरिकांना केंद्रबिंदू मानून शासनाचे विविध विभाग जिल्हास्तरावर जनतेची कामे करण्यासाठी तयार असतात. आधुनिक तंत्रज्ञान आता लोकविकासाचे साधन बनले आहे. कुणावरही टीका-टिप्पणी न करता आपले कर्तव्य चोख बजवावे. लोकांप्रती समर्पण असावे. शिस्तप्रियता असावी, तणावमुक्त काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.पांडे यांनी केले. निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांची यावेळी उपस्थिती होती.

Web Title: Civil Service Award for Due to Releasing Revenue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.