दोन गटांत हाणामारी
By Admin | Published: June 15, 2017 11:25 PM2017-06-15T23:25:05+5:302017-06-15T23:32:47+5:30
जिंतूर : तालुक्यातील पांगरी येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना १५ जून रोजी दुपारी १.२५ च्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर : तालुक्यातील पांगरी येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना १५ जून रोजी दुपारी १.२५ च्या सुमारास घडली.
पांगरी येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. गजाने व काठ्या, दगडाने मारहाण केल्याची फिर्याद प्रभाकर घनवटे यांनी जिंतूर पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे. यावरून दत्ता चांदणे, कचरु चांदणे, प्रभाकर चांदणे, संतोष चांदणे, तुकाराम चांदणे, मोहन चांदणे, हरिभाऊ चांदणे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. तर वडिलांबरोबर तीन-चार महिन्यांपूर्वी काही कारणावरून वाद झाला होता. त्याचा संशय मनात धरून प्रभाकर घनवटे, अशोक घनवटे, उत्तम घनवटे, वैजनाथ घनवटे, बबन घनवटे, कैलास घनवटे, प्रसाद घनवटे यांनी पेरणी यंत्राच्या लोखंडी नळीने जबर मारहाण केल्याची फिर्याद तुकाराम चांदणे यांनी दिली आहे. यावरून जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान, या मारहाणीत अशोक घनवटे व सविता घनवटे यांना गंभीर दुखापत झाल्याने परभणी येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक सुरेश नरवाडे पुढील तपास करीत आहेत.